आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका वर्षात झाले ७१,५०० काेटींचे बँक घाेटाळे, वर्षाभरात ७४% वाढ : रिझर्व्ह बँकेचा अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बँकांबराेबर हाेणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढ हाेत आहे. गेल्या एक वर्षात बँक घाेटाळ्यात ७३.६८ % वाढ झाली असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या  आकडेवारीमध्ये म्हटले आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात देशातील बँकांमध्ये ७१.५०० काेटी रुपयांचे एकूण ६.८०० बँक घाेटाळे झाले. त्या तुलनेत २०१७-१८मध्ये ५,९१६ घाेटाळ्यांची प्रकरणे झाली. 


यामध्ये एकूण ४१,१६७.०३काेटी रुपयांचे घाेटाळे झाले असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकाराच्या उत्तरात ही दिली आहे. गेल्या ११ आर्थिक वर्षामध्ये घाेटाळ्याची एकूण ५३,३३४ प्रकरणे झाली.यामध्ये बँकांना एकूण २.०५ लाख काेटी रुपयांचा फटका बसला आहे.  अशा प्रकारच्या घाेटाळ्यांचे  गुन्हेगारी अहवाल सक्षम तपास संस्थांच्या समक्ष दाखल करण्यात आले आहेत. परंतु आतापर्यंत काेणत्या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली याची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही

 

 या १३ क्षेत्रांत झाले सर्वाधिक घाेटाळे

हिरे अाणि दागिने, निर्मिती उद्याेग, कृषी, माध्यम,  नागरी उड‌्डाण, सेवा अाणि प्रकल्प,धनादेश, ट्रेडिंग, माहिती तंत्रज्ञान, निर्यात व्यवसाय,  मुदत ठेव, डिमांड लोन अाणि लेटर ऑफ कंफर्ट.

 

आतापर्यंत किती बँक घाेटाळ्यांचा तपास झाला
गुन्हा अन्वेषण खात्याने २०१८ मध्ये दाेन सार्वजनिक बँकांच्या अधिकाऱ्यांना पकडले हाेते. यामध्ये आयडीबीआय बँकेचे माजी सीएमडी, एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. सिवाकरन यांच्या मुलाला त्याने नियंत्रित केलेल्या कंपन्यांना देण्यात आलेल्या ६०० काेटी रुपयांच्या कर्ज घाेटाळा प्रकरणात अटक केली हाेती.  हे कर्ज  आयडीबीआय बँकेने दिले हाेते. या प्रकरणी सीव्हीसीने प्रकरण दाखल केले. त्यानंतर २०१० ते २०१४ या कालावधीत आयडीबीआय बँकेत वरिष्ठ  पदावरच्या १५ अधिकाऱ्यांच्या विराेधात प्रकरण दाखल करण्यात आले. यामध्ये इंडियन बँकेचे एमडी आणि सीईओ किशाेर खरात (ते या कालावधीत आयडीबीआय बँकेचे एमडी आणि सीईओ हाेते), मेलविन रेगा (माजी उप व्यवस्थापकीय संचालक) आणि तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एस. राघवन यांची नावे एफआयआरमध्ये हाेती. सीव्हीसी बराेबर सीबीआय देखील माेठ्या बँक घाेटाळ्यांचा तपास करत आहे.