आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगाऱ्यांसोबत सापडले 72 वर्षांचे आजोबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 धुळे - शहरातील वडजाई रोडला लागून असलेल्या एका शेतात रात्रीच्या सुमारास जुगार खेळणाऱ्यांवर एलसीबीने कारवाई केली. यात पाच जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये ७२ वर्षे वय असलेले अलाउद्दीन शेख यांनाही पकडले. पोलिसांनी या कारवाईत जुगाराची साधने व रोख रक्कम जप्त केली. मोहाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला. 

 

वडजाई राेडजवळील अन्वर नाल्याला लागून महेमूद पठाण यांचे शेत आहे. या शेतात पत्री शेडजवळ काही जण जुगार खेळत आहेत, अशी माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पथकाने काल रविवारी रात्री या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत मेहमूद खान हुसेन खान ( वय ५०) रा. सुल्तानिया मदरशाजवळ, जामचा मळा, अनिस नथ्थू शेख (वय ३८), फिरोज करीम पठाण (वय ३१) दोघे रा. अंबिकानगर, शेख मुश्ताक हाजी रशीद (वय ४२) रा. आझादनगर, वडजाई रोड, मारुती मंदिराजवळ, शेख अलाउद्दीन शेख निजामोद्दीन (वय ७२) रा. वडजाई रोड यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २० हजार ५०० रुपये व जुगाराची साधने जप्त करण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...