आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या श्रीमंत म्हाताऱ्याला फक्त मुल जन्माला घालण्यासाठी पाहिजे पत्नी, अब्जावधींचा मालक बनेल तिचा मुलगा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या एका धनाढ्य म्हाताऱ्याने 72 वर्षाच्या वयात पत्नीचा शोध सुरू केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याच्या अब्जावधींच्या संपत्तीचा वारस जन्माला घालण्यासाठी त्याला एका तरुण पत्नी हवी आहे. पण त्याने नवरीसाठी अनेक अटीही ठेवल्या आहेत. त्याला अद्याप त्याच्या मनासारखी पत्नी मिळालेली नाही जी त्याच्या इच्छा पूर्ण करू शकेल. पण त्याच्या अटींना सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे. 


अशी पत्नी हवी
- सर बेंजामिन स्लेड नावाचा हा म्हातारा समरसेटमध्ये 13व्या शतकातील एका मेन्शनमध्ये राहतो. किंग चार्ल्स सेकंडच्या कुटुंबातील असल्याचे तो सांगतो. त्याच्याकडे प्रचंड प्रॉपर्टी आणि मोठा व्यवसाय आहे. 
- नुकतेच त्याने सांगितले की त्याला 30 - 40 दरम्यान वय असलेली तरुण पत्नी हवी आहे. त्याने सोशल मीडियावर ही घोषणा केली तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. 
- या व्यक्तीने अटींमध्ये महिलेला हेलिकॉप्टर उडवणे, बंदूक चालवणे येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. बेंजामिनच्या मते त्याच्या कुटुंबात कोणीही नसल्याने तो भविष्याचा विचार करून घर आणि व्यवसाय दोन्ही व्यवस्थित सांभाळेल अशी पत्नी त्याला हवी आहे. 
- ही महिला स्कॉर्पियन (वृश्चिक राशी) नको कारण अशा मुली धोकादायक असतात असे त्याचे मत आहे. तो म्हणतो की अनेकदा त्याला म्हाताऱ्या महिला भेटतात किंवा अशा तरुणी भेटतात ज्यांना त्याच्याकडून मूल नको आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...