आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या देखभालीसाठी एकल पुरुष पालकाला मिळेल 730 दिवसांची रजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एकल पालक महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे पुरुषांनाही मुलांच्या देखभालीसाठी रजा मिळेल. पूर्ण नोकरीच्या काळात ७३० दिवस ते पगारी रजा घेऊ शकतील. आजवर मुलांच्या देखभालीसाठी त्यांना रजा नव्हती. 


एकल पालक पुरुषांच्या सोयीसाठी कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली. यानुसार, पुरुषांना मुलांचे आजारपण, अभ्यास अशा कामांसाठी ७३० दिवस रजा घेता येईल. सुरुवातीच्या ३६५ रजांसाठी १००% तर पुढील ३६५ दिवसांच्या सुट्यांसाठी ८०% वेतन मिळेल. वर्षातून तीन वेळेपेक्षा जास्त मुलांच्या देखभालीसाठी सुटी घेता येत नाही. एका वेळी पाच दिवसांपेक्षा कमी सुटी घेता येणार नाही. मुलाचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असल्यासच ही रजा घेता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...