आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 74 Houses Cooked Cook On Solar Electric Heater In Madhya Pradesh; The First State In The World: IIT's Claim

मध्य प्रदेशातल्या बांचामधल्या ७४ घरांमध्ये साैर इलेक्ट्रिक चुलीवर शिजते अन्न; जगातील पहिले राज्य : आयआयटीचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैतूल - मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्ह्यातील बांचा गाव हे जगातील पहिले असे गाव आहे ज्या ठिकाणी सर्व ७४ घरांमध्ये साेलार इलेक्ट्रिक चुलीवर अन्न शिजवले जात असल्याचा दावा आयआयटीचे तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक व्यंकट पवन कुमार यांनी केला.  देशात आधी साेलार प्लेटवर अन्न शिजवत हाेते. परंतु आयआयटी मुंबईच्या टीमने बांचा गावासाठी पहिल्यांदा खास प्रकारच्या इलेक्ट्रिक चुलीची निर्मिती केली आहे. चुलीवर अन्न शिजवण्यासाठी येथील गावकऱ्यांना आता झाडे कापावी लागत नाहीत. गावातील सर्वच महिला साैर ऊर्जेवर चालणाऱ्या चुलीवर जेवण बनवतात. यामुळे पर्यावरण रक्षणाबराेबरच या महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

 

भारत-भारती शिक्षण समितीचे माेहन नागर म्हणाले की, गावांमध्ये साैर ऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारने स्पर्धा आयाेजित केली हाेती. यामध्ये आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी साैर ऊर्जेवर चालणाऱ्या चुलीचे माॅडेल तयार केले हाेते. त्यानंतर या माॅडेलच्या चाचणीसाठी   देशातील समितीने केंद्रीय वायू आणि  एक गाव निवडायचे हाेते. पेट्राेलियम मंत्रालयाच्या आेएनजीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामध्ये घाेडाडाेंगरीच्या बांचा गावाचा प्रस्ताव दिल्यानंतर या गावाची निवड झाली.  सप्टेंबर २०१७ मध्ये साैर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले.  डिसेंबर २०१८ मध्ये सर्व घरांमध्ये ऊर्जा प्लेट, बॅटरी आणि चुली लावण्यात आल्या. आता चुलीसाठी गावात झाडे ताेडली जात नाहीत, असे बांचा गावातील गावकरी म्हणाले.


एका उपकरणाची किंमत ८० हजार, संख्या वाढली तर खर्च कमी हाेईल
पवन कुमार म्हणाले, प्रत्येक उपकरणासाठी ८० हजार रुपये खर्च आल्याने सुरुवातीला कमी प्रमाणात साैर इलेक्ट्रिक चुली तयार करण्यात आल्या. जर चुलींची संख्या जास्त असेल तर हा खर्च ३५ ते ६० हजार रुपयांपर्यंत कमी हाेऊ शकताे. या उपकरणावर पाच जणांसाठी तीन वेळचे जेवण, चहा आणि नाष्टा बॅकअप ऊर्जेने बनू शकताे. दिवसा हेच जेवण थेट साैर प्लेटच्या माध्यमातून बनवता येते. त्याच्याच जाेडीला ऊर्जाही साठत राहते, असे पवन कुमार म्हणाले.

 

सकाळी तसेच रात्रीही अन्न शिजवता येते
आयआयटी मुंबईचे तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक पवन कुमार म्हणाले, बांचा गावातल्या ७४ घरांमध्ये आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी साैर ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक चुली लावल्या आहेत. या चुलींच्या साेलार प्लेटद्वारे ८०० व्हाेल्ट इतकी वीज निर्मिती हाेते.यातील बॅटरीमध्ये ३ युनिट वीज साठवली जाते. या चुलीमध्ये पाच जणांच्या कुटुंबासाठी दिवसातून तीन वेळा अन्न शिजवले जाऊ शकते तसेच रात्रीच्या वेळीही जेवण बनवता येऊ शकते.

 

> साैर ऊर्जेवर चालणाऱ्या साेलार चकतीद्वारे एका दिवसात हाेते ८०० व्हाेल्ट वीज निर्मिती
> बॅटरीमध्ये विजेची हाेते बचत, ज्यामुळे तीन वेळा अन्न शिजते

बातम्या आणखी आहेत...