• Home
  • 74 year old woman gave birth to twin

गुंटूर / ५४ वर्षांपासून मूल होण्याची होती अपेक्षा ७४ वर्षीय महिलेने दिला जुळ्याला जन्म

आंध्रातील गुंटूरमध्ये  आयव्हीएफ तंत्राने झाला जुळ्या मुलांचा जन्म
 

वृत्तसंस्था

Sep 19,2019 11:38:52 AM IST

गुंटूर - आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे ७४ वर्षीय महिलेने एका जुळ्याला जन्म दिला आहे. या महिलेचे लग्न होऊन ५७ वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता तिला अपत्यप्राप्ती झाली. तिच्या प्रसूतीसाठी दवाखान्यात सर्व सुविधा ठेवण्यात आल्या होत्या. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नेलापरतिपादू येथे येररामती राजा यांचा २२ मार्च १९६२ रोजी मंगायाम्माशी लग्न केले होते. उभयतांना मूल व्हावे असे वाटत होेते. वृद्धापकाळ जवळ आला तरी त्यांची मातापिता होण्याची इच्छा अपूर्ण होती. त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेस आयव्हीएफ पद्धतीने गर्भ राहिला. मंगायाम्मा यांनी तिच्यापासून प्रेरणा घेत पतीसोबत गुंटूर येथे जाऊन एका नर्सिंग होमशी संपर्क साधला. तेथे त्यांची भेट आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या डॉक्टरांची भेट झाली. डॉक्टरांनी मंगायाम्मा याच्या पतीचे स्पर्म घेऊन त्याचा आयव्हीएफ प्रणालीत प्रयोग केला. तो यशस्वी ठरला. तिने जुळ्याला जन्म दिला.

X
COMMENT