आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 75 year old Actress And Kajol's Mother Tanuja Is Suffering From Stomach Disorder, Will Undergo Surgery Today.

पोटाच्या आजाराने ग्रस्त आहेत 75 वर्षांच्या अभिनेत्री तनुजा, काल रुग्णालयात केले होते दाखल, आज होणार आहे सर्जरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अजय देवगणचे पिता वीरू देवगण यांचे निधन झाल्याच्या एक दिवसानंतर काजोलची आई म्हणजेच अभिनेत्री तनुजा यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. तनुजा यांना पोटाच्या आजारामुळे रुग्णालयात आणले गेले. रिपोर्ट्सनुसार, लवकरच त्यांची एक सर्जरी केली जाईल.  

 

पोटाची होईल सर्जरी... 
मंगळवारी संध्याकाळी काजोल रुग्णालयाबाहेर दिसली. ती आपल्या आईला भेटायला तेथे पोहोचली होती. 75 वर्षांच्या तनुजा यांना डायवर्टिकुला या अजरामुळे पोटाचा त्रास झाला. लवकरच तुनजा यांच्या पोटाची सर्जरी केली जाईल. डायवर्टिकुला एक अस आजार आहे. ज्यामध्ये आतड्यांना सूज येते. डायवर्टिकुलामुळे पोट दुखीव्यतिरिक्त डायरिया आणि ज्वर वाढण्याचाही त्रास होतो. 

 

सासऱ्यांच्या निधनानंतर काजोलला आता आईची काळजी...  
सोमवारीच काजोलचे सासरे वीरू देवगण यांचे अंतिम संस्कार केले गेले आणि आता तिच्या आईची तब्येत खराब झाल्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण आहे. मागच्या दोन दिवसात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज अजय-काजोल यांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. काजोलला ऐश्वर्या राय बच्चनसोबत स्पॉट केले गेले होते. ऐश्वर्याने काजोलला आलिंगन देऊन सांत्वन करताना दिसली.