आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- असं म्हणतात शिक्षणाला वयाच बंधन नसत. तुम्हाला जेंव्हा वाटेल तेंव्हा शिक्षण घेता येेत. आयुष्यात रंगही भरता येतात. असे रंग भरण्याचे काम औरंगाबाद शहरातील 75 वर्षांचे डॉ.अरुण चौधरी आजोबा करत असून, सध्या सुरु असलेल्या एलिमेंटरी परीक्षा ते देत आहे. 17 वर्षे सेवानिवृत्तीला झाले असून, डॉ.चौधरी यांनी सर्वां समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सकाळी 10.30 ची वेळ गारखेडा परिसरातील डॉ.आर.पी.नाथ हायस्कुल परीक्षा केंद्रावर तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने एक जेष्ठ आले आणि शिक्षकांना म्हणाले, अहो सर हे माझ ओळखपत्र माझा आसन क्रमांक कोेेणत्या वर्गात आहे सांगा मी परीक्षेसाठी आलो आहे. वर पाहताच शिक्षकही अचंभित झाले. इतके जेष्ठ आणि तेही एलिमंेट्री परीक्षेला आले आहेत. डॉ.चौधरी यांचा उत्साह परीक्षेसाठी केलेली तयारी पाहून त्यांनाही कौतुक वाटले. परीक्षा केंद्रावर वेळेेत हजर राहणाऱ्या या चौधरी आजोबांचे शाळेनेही स्वागतच केले. शहरातील हिंदू राष्ट्र चौक गारखेडा परिसरात राहणारे डॉ.अरुण चौधरी हे असिस्टंट कमिश्नर म्हणून प्रशासकीय सेवेत होते. आज त्यांना सेवानिवृत्त होवून सतरा वर्ष झाली आहे. सेवानिवृत्ती नंतर नैराश्य येत.पण माझ्या नातीमुळे मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. जन्मत:च कलर ब्लाइण्डनेस आहे. पण तरी या रंगांनी माझ्या आयुष्यातील रंगांना बहर आणल्याचे चौधरी यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.
चौधरी म्हणाले, मी तसा मुळचा नांदेड जिल्हयातील मुदखेडचा पण आता औरंगाबादेच राहतो. मला एक मुलगा आणि दोन मुली नातवंड आहे. माझी नात तर वडिलांप्रमाणेच एमटेक झाली आहे. सेवानिवृत्तीनंतर घरात बसून राहू शकलो असतो.पण आयुष्याच नैराश्य टाळून आयुष्य आनंद आणि रंगीत करण्यासाठी मी नातीमुळेच ही कला जोपासली. तिचा आता लळा लागला आहे. तिच्यामुळेच आज मी एलिमेंटरी परीक्षा देतो आहे. पुढे शरीराने साथ दिली तर, पुढील वर्षीही इंटरमिजीएट परीक्षाही देईल.
कला शाखांचा विकास करा शासनाकडे मागणी -
मेडिकल असो वा इंजिनिअरिंग कोणत्याही शिक्षण शाखेचा पाया हा कलेपासून आहे. एकीकडे शासनाने कला शिक्षकच नसावे अशी स्थिती केली आहे. तर दुसरीकडे कला हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा चेहरा आहे. तिला प्रोत्साहन द्या तिचा विकास करा अशी मागणी आपण करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. मी जन्मत: कलर ब्लाइण्डनेस आहे. पण हे रंगच आयुष्य बदलू शकतात आता पुढेही ही कला जोपासत राहणार असल्याचेही चौधरी म्हणाले.
रोज पाच किलोमीटर चालतो -
दरम्यान तरुणांनाही लाजवेल असा उत्साह कसा? याचे रहस्य काय असे विचारले जसता चौधरी म्हणाले मला मधुमेह आहे. पण मी सर्व पथ्य पाळतो. नियमित पाच किलोमीटर चालतो. मन प्रसन्न आणि उत्साही ठेवण्यासाठी कला जोपासतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.