आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भोपाळ : भोपाळच्या जिल्हा न्यायालयात एका 75 वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कुटुंब न्यायालयाने याबाबत सुनावणी सुरू केली असता घटस्फोटाचे वेगळेच कारण समोर आले. प्राध्यापकाचा घरात काम करणाऱ्या विवाहीत मोलकरणीवर जीव जडला असून त्याला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. यासाठी त्याला पत्नीकडून काडीमोड हवा असल्याचा खुलासा करण्यात आला. मोलकरणीला दोन मुले देखील आहेत.
35 वर्षानंतर पु्न्हा लग्न करण्याची प्राध्यापकाची इच्छा
कुटुंब न्यायालयाचे काउंसलर नुरुनिशा खान यांनी सांगितले की, त्यांना जेव्हा 75 वर्षीय वृद्धाच्या घटस्फोटाबाबत सुनावणी करायची आहे तेव्हा वाटले की, बहुतेक मुलांनी संपत्तीसाठी वृद्ध दाम्प्यत्यांमध्ये दरी निर्माण केली आहे. जेव्हा त्यांनी वयस्कर दाम्प्यत्य आणि त्यांच्या मुलांना सुनावणीसाठी बोलविले तेव्हा त्यांना समजले की, 75 वर्षीय वृद्धाला लग्नाच्या 35 वर्षानंतर पुन्हा बोहल्यावर चढण्यासाठी पत्नीकडून काडीमोड घेत आहेत. त्यांना दोन मुले असून एक इंजीनिअर आहे तर दूसरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. प्राध्यापकाचे याआधी सुद्धा घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत संबंध होते. याचा विरोध केला असतो प्राध्यापक घरात वाद घालत होते. वडिलांना अनेकवेळा समजावून सांगितल्यानंतरतही त्यांनी ऐकले नाही. घरातील वाद टोकाला जात असल्यामुळे मुले आपल्या आईला घेऊन वडिलांपासून वेगळे झाले. ही गोष्ट घटस्फोटापर्यंत जाईल असे मुलांना वाटले नव्हते.
आई-वडिलांनी प्रेमविवाह केला असल्याचे मुलांनी सांगितले
मुलांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, त्यांच्या आई-वडिलांनी प्रेमविवाह केला होता. वडील जेथे प्राध्यापक होते तेथेच त्यांचा आई शिकत होती. वडील घरातील मोलकरणीवर खूप पैसे खर्च करत होते. याबाबत त्यांना अनेकवेळा समजावून सांगितले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. मुलांनी सांगितले की, आई वर्किंग वुमन होती यामुळे घरात एक नोकर असणे आवश्यक होते. घरात मुलगी असल्यामुळे पुरूष नोकर ठेवू शकत नव्हतो. पण आता त्याचा परिणाम आईला आणि आम्हाल भोगावा लागत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.