आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानी मोगदिशूमध्ये भीषण बॉम्ब विस्फोट; पोलिस आणि विद्यार्थ्यांसह 76 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विस्फोटात 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले

मोगदिशू- सोमालियाची राजधानी मोगदिशूमध्ये आज(शनिवार) सकाळी एका कारमध्ये झालेल्या भीषण विस्फोटात 76 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी प्रवक्ते इस्माइल मुख्तारने सांगितले की, मृतांमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांचा समावेश आहे. हा विस्फोट एका कार टॅक्स कलेक्शन सेंटरवर झाला, यात अंदाजे 100 जण जखमी झाले आहेत. मोगदिशू शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांसाठी चेकपोस्ट बनले आहेत. या चेकपोस्टवर टोल आकारला जातो. विस्फोट झाला त्यावेळेस अनेक वाहने उभी होती. अद्याप कोणत्याच संघटनेने या विस्फोटाची जबाबदारी घेतली नाहीये. सांगितले जात आहे की, "अल कायदा"शी संबंधित असलेल्या "मिलितया अल-शबाब"ने हा हल्ला केला असावा.

विस्फोटात वापरलेली कार अज्ञात लोक घेऊन आले होते

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, काही अज्ञान लोक एका कारला घेऊन आले आणि पार्क करुन निघून गेले. या विस्फोटात कारचा चुराडा झाला, तसेच अनेक लोकांच्या शरिराचे तुकडे परिसरात विखुरले आहेत. विस्फोटानंतर पोलिस आणि अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले.