Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 76 patients of malaria and 803 cases of dengue

डेंग्यूचे तब्बल ८०३ तर हिवतापाचे ७६ रुग्ण; अमरावती विभागाला साथरोगांचा विळखा

दिव्य मराठी | Update - Aug 25, 2018, 11:15 AM IST

अकाेला- अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या पाच जिल्ह्यात डेंग्यूचा प्रभाव चांगलाच वाढला अाहे. १ जानेवारी ते २१ ऑ

  • 76 patients of malaria and 803 cases of dengue

    प्रतिनिधी- अकाेला- अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या पाच जिल्ह्यात डेंग्यूचा प्रभाव चांगलाच वाढला अाहे. १ जानेवारी ते २१ ऑगस्ट १८ दरम्यान डेंग्यूचे ११७ बाधित रुग्ण आढळले असून ६८६ संशयित रुग्ण आढळले. तसेच तसेच हिवतापाचे ७६ रुग्ण अाढळले अाहे.


    हिवतापासाठी अकोला जिल्ह्यात १,८५,४१३ रक्त नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ संशयित आढळले. वाशीम जिल्ह्यात १,३४,७३८ रक्त नमुने तपासले असता ९ संशयित आढळले. अमरावती जिल्ह्यात २,५८,१३५ रक्त नमुने तपासून त्यामध्ये २७ संशयित तर दोघांना हिवताप झाल्याचे आढळले. बुलडाणा जिल्ह्यात २,६६,७८१ रक्त नमुन्यातून १० रुग्ण संशयित तर १ बाधित आणि यवतमाळ जिल्ह्यात ३,०७,५२४ जणांचे रक्त नमुने तपासून ४ संशयित तर एकालाही बाधा झाल्याचे आढळले नाही.


    'स्क्रब टायफस'मुळे नागपुरात पाच रूग्णांचा मृत्यू
    "स्क्रब टायफस' या जीवाणुजन्य आजारामुळे नागपुरात पाच रूग्णांचा मृत्यू झाला असून आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने खळबळ माजली आहे. हे सर्व रूग्ण सध्या मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 'चिगर माईट्स' नावाच्या सूक्ष्म जीवाणूमुळे हा आजार होतो. या जीवाणूचा आकार ०.२ ते ०.४ मिलीमीटर एवढा असतो. झाडे-झुडुपे आणि गवत वाढलेल्या ठिकाणी ते असतात. या रोगावर तत्काळ उपचार न घेणाऱ्या ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. 'स्क्रब टायफस'ची पहिली नोंद १८९९ मध्ये जपानमध्ये घेण्यात आली. आपल्या देशात तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि विदर्भात या रोगाचे रुग्ण सापडतात.

Trending