आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षे लहान वेट्रेसवर जडला 77 वर्षांच्या अब्जाधीशाचा जीव, तीही झाली त्याच्यासाठी वेडी, लग्न ठरले अन् असे घडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये सध्या एका लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे. 77 वर्षांच्या एका अब्जाधीशाने 45 वर्षे लहान तरुणीबरोबर लग्न केले. ही तरुणी या व्यक्तीच्या मुलीपेक्षाही 15 वर्षांनी लहान आहे. त्यांचे अफेयर 6 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. दोघे आधीच लग्न करणार होते. पण त्यावेळी या व्यक्तीची पहिली पत्नी ऐनवेळी नाराज झाल्याने ते शक्य झाले नाही. त्यानंतर या व्यक्तीने पहिल्या पत्नीबरोबरचे 25 वर्षे जुने नाते तोडत या तरुणीशी लग्न केले. 


कॅफेत होती वेट्रेस 
- लंडनचे अब्जाधीश उद्योगपती मोहम्मद इल्ताफ शेख (77) यांनी गेल्या महिन्यात उझबेकिस्तानच्या गुली मुराडोवा (32) हिच्याशी लग्न केले. दोघांच्या वयात 45 वर्षांचे अंतर आहे. तरीही तरुणी लग्नाला तयार झाली. 
- इल्ताफने गुलीला सर्वात आधी 2012 मध्ये ती वेट्रेस म्हणून काम करत असलेल्या कॅफेत पाहिले होते. त्यावेळी गुली 27 वर्षांची होती. इल्ताफला ती पाहताक्षणी आवडली होती. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. 
- इल्ताफ या नव्या गर्लफ्रेंडला सर्व सुख-सुविधा आणि लक्झरी लाइफस्टाइल पुरवू लागले. त्यामुळे गुली इम्प्रेस झाली. ते तिला महागड्या हॉटेलांत न्यायचे आणि त्याच्या खर्चावर गुलीला ऐश करायला लावायचे. 
- या नात्यामुळे इल्ताफची पहिली पत्नी जराही आंदी नव्हती. दोघांना कॅफेत एकत्र पाहिल्यानंतर ती गुलीबरोबर भांडलीही होती. त्यानंतर काही दिवसांनी गुली उझबेकिस्तानला परतली होती. 
- गुली परतल्यानंतर इल्ताफने तिला लग्नासाठी विचारले. तीही तयार झाली. डिसेंबर 2012 मध्ये ते लग्न करणार होते. पण एक दिवस आधी इल्ताफने लग्न मोडले. 


घटस्फोटानंतर केले लग्न 
- लग्नम मोडल्यानंतर इल्ताफने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देत 25 वर्षे जुने लग्न मोडले. नंतर पुनहा गुलीला लग्नासाठी तयार केले. 
- गेल्या महिन्यात दोघांनी लंडनच्या एका मोठ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न केले. त्यात इल्ताफचे अनेक कुटुंबीय आले होते. त्यात इल्ताफची मोठी मुलगी झरीनाही होती. ती नवरी गुलीपेक्षा 15 वर्षांची मोठी आहे. 

बातम्या आणखी आहेत...