world menstrual cycle / मासिक पाळीत ७८% शहरी, तर ४८% ग्रामीण महिलाच स्वच्छ ; जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त माहिती समोर

पाळीतील अस्वच्छतेमुळे महिलांमध्ये ७० टक्के संसर्ग
 

वृत्तसंस्था

May 29,2019 11:52:00 AM IST

नवी दिल्ली - देशात सध्या ३५.५ काेटी महिला मासिक पाळी येत असलेल्या वयाच्या टप्प्यात आहेत. मात्र, आजही या विषयावर सर्वत्र माेकळेपणाने चर्चा हाेत नाही. त्यामुळे या विषयाबाबत अनेकांमध्ये गैरसमज आहेत. राष्ट्रीय आराेग्य कुटुंब सर्वेक्षणानुसार मासिक पाळीच्या काळात स्वच्छता बाळगण्याचे प्रमाण शहरी भागातील महिलांमध्ये ७८ टक्के तर ग्रामीण भागात ४८ टक्के असल्याचे समाेर आले आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयातील संयुक्त सचिव वंदना गुरनानी यांनी ही माहिती दिली. अॅसाेचॅमने आयाेजित केलेल्या ‘मेंस्ट्रएल हायजिन, नीड टू ब्रेक द सायलेंस अँड बिल्ड अवेरनेस’ कार्यक्रमात या विषयावर जागरूक राहण्याची आवश्यकता व्यक्त केली.


वंदना गुरनानी म्हणाल्या, केरळ, दिल्ली, सिक्किम व हरियाणातील ९० टक्के महिलांनी सॅनिटरी पॅड्सचा वापर करत असल्याचे सांगितले. मात्र, बिहारमध्ये हा आकडा ३० टक्केच दिसून आला. यातून तेथील अशिक्षितपणा दिसून येताे, तसेच जागरूकतेचीही आवश्यकता अधाेरेखित हाेते. याशिवाय आर्थिक कारणांमुळे या महिला सॅनिटरी पॅड्सचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्या आजही यासाठी जुन्या कपड्यांचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे २८ मे हा दिवस जगभरात मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जाताे.

X
COMMENT