आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 78% Of Companies Expect Income Tax Exemption Limit To Increase, 82% Said Deduction Will Increase Under 80c

78% कंपन्यांना आयकर सूट मर्यादा वाढण्याची अपेक्षा, 82% म्हणाले - 80 सी अंतर्गत डिडक्शन वाढेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील, जीडीपी ग्रोथवर फोकस राहील
  • मागच्यावर्षी कॉर्पोरेट टॅक्स घटवल्यानंतर पर्सनल इन्कम टॅक्समध्ये कपात वाढण्याची अपेक्षा वाढली

बिझनेस डेस्क : उद्योग जगताला अपेक्षा आहे की, अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये सूट मिळण्याची घोषणा केली जाईल. टॅक्स कन्सल्टन्सी फर्म केपीएमजीने 18 सेक्टरच्या 219 कंपन्यांचा सर्व्हे केला. यामध्ये 78% कंपन्यांना वाटते की, आयकर सूट सध्याची मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त केली जाईल. 72% ना अपेक्षा आहे की, जास्तीतजास्त 30% टॅक्ससाठी आयकारची किमान मर्यादा वाढवली जाईल. आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्तच्या आयकरवर 30% टॅक्स लागतो. 82% कंपन्या म्हणाल्या, 80 सी अंतर्गत डिडक्शन वाढवले जाईल. 53% ला स्टॅंडर्ड डिडक्शन वाढवणे आणि 44% ला एचआरए सारखा टॅक्स फ्री अलाउन्स वाढण्याची अपेक्षा आहे. 

53% कंपन्या म्हणाल्या, लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्सवरील टॅक्स हटवला पाहिजे... 

केपीएमजीच्या सर्व्हेमध्ये जास्तीत जास्त कंपन्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, देशांतर्गत कंपन्यांनंतर आता परदेशी कंपन्यांसाठीही कराचे दर कमी करता येऊ शकतात. सोबतच अपेक्षा व्यक्त केली की, इन्हेरिटन्स टॅक्सची घोषणा केली जाणार नाही. सर्व्हेमध्ये सामील 50% कंपन्यांची मान्यता आहे की, सेजच्या अंतर्गत एक्सपोर्टमध्ये टॅक्स सूट मर्यादा मार्च 2020 च्या नंतर सुरु होणाऱ्या कंपन्यांसाठीही वाढवली जाईल. 

प्रश्न 'हो' म्हणून उत्तरे देणाऱ्या कंपन्या 
कंपन्यांवर डिव्हीडंट डिस्ट्रीब्यूशन टॅक्स संपला पाहिजे    54%
सेज अंतर्गत टॅक्स हॉलिडेचा वेळ मार्च 2020 पासून पुढे जाण्याची शक्यता आहे50%
दिवाळखोरी प्रक्रियेत गुंतलेल्या कंपन्यांना कोणतीही कर सवलत मिळेल31%
दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर 10% कर कमी केला जावा53%
सुरक्षा व्यवहार कर संपला पाहिजे42%
परदेशी कंपन्यांवरही करांचे दर कमी केले जावेत52%
कराच्या ई-अ‍ॅसेसमेंट (ई-मूल्यांकन) योजनेतून पारदर्शकता वाढेल68%
ई-अ‍ॅसेसमेंटने (ई-मूल्यांकन) करदात्यांना फायदा होईल70%

पर्सनल इन्कम टॅक्समध्ये घट झाल्याने खर्च आणि गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा... 

सरकारने सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट टॅक्स कमी केला होता. त्यानंतर पर्सनल इन्कम टॅक्समध्ये कपातीच्या शक्यताही सुरु झाल्या होत्या. मात्र कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपातीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये तेवढी सुधारणा दिसली नाही, जेवढी अपेक्षा केली गेली होती. अशात ग्रोथ वाढवण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करू शकते. केपीएमजीच्या को-हेड (टॅक्सेशन प्रॅक्टिस), हितेश गजारिया यांनी सांगितले की, सर्व्हेमध्ये सामील असलेल्या सर्व कंपन्यांची सर्वात जास्त अपेक्षा पर्सनल इन्कम टॅक्समध्ये कपातीची आहे, असे झाल्यास खर्च आणि गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा राहील. 
 

बातम्या आणखी आहेत...