Home | National | Delhi | 79 seats in fourth phase of election but criminal and corepati candidates are more

चौथ्या टप्प्यात सर्वात कमी 79 जागा; परंतु कलंकित व काेट्यधीश उमेदवारांची संख्या सर्वाधिक

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 25, 2019, 08:44 AM IST

29 एप्रिलच्या चाैथ्या टप्प्यात 27 % उमेदवार कलंकित व 33 % काेट्यधीश.

  • 79 seats in fourth phase of election but criminal and corepati candidates are more

    नवी दिल्ली - चौथ्या टप्प्यात 71 जागांसाठी मतदान हाेईल. त्यासाठी 943 उमेदवार मैदानात आहेत; परंतु गुन्हेगारी प्रतिमा व काेट्यधीश असलेल्या उमेदवारांची संख्या गत तिन्ही टप्प्यांपेक्षा जास्त आहे.

    > भाजपचे कलंकित उमेदवार यात 35 % वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. (एकूण 57 उमेदवार, 25 कलंकित)

    > काँग्रेसचे कलंकित उमेदवार यात 16 % वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. (एकूण 57 उमेदवार, 18 कलंकित)

    चौथ्या टप्प्यात 210 उमेदवार कलंकित

    23 % म्हणजे 210 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून, त्यात 17 % म्हणजे 158 जणांवर गंभीर गुन्हे. 33 % म्हणजे 306 उमेदवार काेट्यधीश. एकूण 943 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 4.53 काेटी रुपये एवढी आहे.

    21 उमेदवार महिलांवर अत्याचाराचे आरोपी

    > 5 उमेदवारांवर हत्येचे गुन्हे दाखल अाहेत.
    > 24 जणांवर हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल.
    > 4 उमेदवारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल.

Trending