Home | International | China | 79 year old beggar in China ousted as wealthy grandma

रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसून मागायची भीक, वय पाहून लोकांना आली दया,सत्य समोर येताच सगळे झाले चकीत...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 04, 2018, 04:15 PM IST

त्या महिलेचा मुलगा आला, आणि जगासमोर सांगितली सत्यता.

 • 79 year old beggar in China ousted as wealthy grandma


  हांगझोऊ- चीनमध्ये रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी 79 वर्षीची एक महिला माध्यमांमधे चर्चेचा विषय होती. महिला स्टेशनवर लोकांकडे भीक मागत होती तेवढ्यात लाउडस्पीकरवर अनाउंस करून पॅसेंजर्सनी त्या महिलेला भीक न देण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या वृद्ध महिलेचा मुलगा समोर आला आणि त्या महिलेची सत्यता सांगितली. महिला खुप श्रीमंत घरातील असून, ती तिच्या मुलासोबत 5 मजलि बंगल्यात राहते. मुलाने सांगितले की, घरच्यांनी अनेक वेळा सांगून पण ती बाहेर भीक मागायला जाते.

  भीक मागणाऱ्या वृद्धा महिलेची गोष्ट
  >> घटना चीनच्या हांगझोउ शहराची आहे, जिथे रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी 79 वर्षाच्या महिलेची गोष्ट नॅशनल न्यूज हेडलाइंस झाली आणि आता सगळ्या देशात चर्चेचा विषय बनली आहे.


  >> महिले बद्दल रेल्वे स्टेशनवर अनाउंस केले गेले की, पॅसेंजरनी तिला भीक देउ नये कारण जे तुम्ही तिला समजत आहात ते ती नाहीये.

  >> या सगळ्यानंतर महिलेचा मुलगा मीडिया समोर आला आणि सांगितले की, त्यांचा परीवार चीनच्या कोणत्याही सामान्य परिवारापेक्षा जास्त श्रीमंत आहे, आणि त्याचा आईला भीक मागायची गरज नाहीये.

  >> मुलाने सांगितले की, ते पाच मजली इमारतीत राहतात आणि त्यांच्या शहरात खुप प्रॅापटी आहेत, ज्या त्यांनी किरायाने दिल्या आहेत, आणि त्यांच्या फॅक्टरी पण आहेत.

  >> मुलाने हे पण सांगितले की, मी माझ्या आईला अनेक वेळा हे काम करण्यापासून थांबवले आहे. पण प्रत्येक वेळेस ती नकार देते.


  त्या महिलेने सांगितले भीक मागण्याचे कारण

  >> मीडिया रिपोर्ट्सनुसार, 79 वर्षाच्या महिलेने पहिले रेल्वे स्टेशनवर मॅप विकणे सरू केले होते, पण रेल्वे प्रशासनाने त्यांना हे करण्यापासून थांबवले.

  >> त्यामुळे, त्यांनी भीक मागणे सुरू केले. रोज सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत भीक मागते. त्यातुन ती रोज ती 3000 रूपये कमवते.त्यातुन तीला स्वत: साठी एक केअरटेकर ठेवायची आहे.

  >> त्या महिलेने सांगितले की, दिवसभर घरात बसून तिला करमत नाही, त्यामुळे ती बाहेर जाते, आणि भीक मागते.

  कोणी केला विरोध तर कोणी बोलले तिच्या बाजुने
  >> यानंतर देशभरात वाद सरू झाला. काही लोकांनी श्रीमंत महिलेच्या अशा भीक मागण्याचा विरोध करू लागले तर, काहींनी तिची बाजु घेत, तिच्या घरच्यांमुळे तिची ही अवस्था झाल्याचे म्हटले.

 • 79 year old beggar in China ousted as wealthy grandma
 • 79 year old beggar in China ousted as wealthy grandma

Trending