आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 79 year old Comedian Diniyar Contractor Passed Away, Got The Padma Shri Award This Year

ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रेक्टर यांचे निधन, वयाच्या 79 व्य वर्षी घेतला अखेरचा श्वास, यावर्षीच मिळाला होता पद्मश्री पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - ज्येष्ठ मॉडेल, कॉमेडियन, चित्रपट आणि थिएटर अभिनेते दिन्यार कॉन्ट्रेक्टर यांचे बुधवारी वयाच्या 79 वर्षी निधन झाले. कुटुंबाने सांगितल्यानुसार, ते खूप दिवसांपासून आजारी होते. दिन्यार यांचा अंतिम संस्कार आजच वरळीतील स्मशान भूमित दुपारी 3.30 वाजता केला जाणार आहे. 

 

यावर्षीच मिळाला होता पद्मश्री पुरस्कार 
दिन्यार यांना 2019 मधे भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिन्यार यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, 'माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. मला वाटले कुणी मूर्ख बनवत आहे. पण जेव्हा खूप सारे फोन कॉल्स आले तेव्हा कळाले की, मला अवॉर्ड दिला जात आहे.  

 

पीएम मोदी यांनी ट्वीट करून व्यक्त केले दुखः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवर दिन्यार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी लिहिले, पद्मश्री दिन्यार कॉन्ट्रेक्टर विशेष होते कारण त्यांनी खूप आनंद पसरवला. त्यांच्या बहुमुखी अभिनयाने अनेक चेहऱ्यांवर हसू आणले. मग तो रंगमंच असो, टेलिव्हिजन असो किंवा चित्रपट असो. त्यांनी सर्वच माध्यमांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या निधनाने दुखी आहे.  

 

या चित्रपटांमध्ये केले काम 
1966 पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिन्यार यांना विशेषतः 'बाजीगर', '36 चाइना टाउन', 'खिलाड़ी', 'बादशाह' यांसारख्या चित्रपटात पहिले गेले होते. त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले होते. दिन्यार यांनी आपले करिअर थिएटर आर्टिस्ट म्हणून सुरू केले होते. ते हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये जास्त काम करायचे.