आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Ann: तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील बॉलिवूडच्या 'जांबाज' अॅक्टरचे हे Rare Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक फिरोज खान आज आपल्यात असते तर 79 वर्षांचे असते. 25 सप्टेंबर 1939 रोजी बेंगळुरूमध्ये जन्मलेले फिरोज खान यांची चित्रपट कारकिर्द अतिशय यशस्वी राहिली आहे. पण त्यांचे वैवाहिक जीवन मात्र काहीसे वादग्रस्त राहिले आहेत. त्यांचे लग्न सुंदरी यांच्याशी झाले होते. पण ज्योतिका धनराजगीर हिच्याशी त्यांचे अफेयर होते. त्यासाठी ते पत्नीपासून विभक्त झाले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली होती. 1960 साली आलेलल्या 'दीदी' चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांचे चित्रपट करिअर चांगले राहिले. दिग्दर्शक म्हणूनही फिरोज खान यांची कारकिर्द यशस्वी राहिली आहे. धर्मात्मा, कुर्बानी, जांबाज आणि दयावान असे एकापेक्षा एक हीट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची साक्ष असलेले त्यांचे काही दुर्मिळ फोटो आपण या पॅकेजच्या माध्यमातून पाहणार आहोत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, फिरोज खान यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाचे काही Rare Photos..

बातम्या आणखी आहेत...