आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7वीत शिकणाऱ्या मुलीवर स्कॉर्पियोमध्ये नराधमानी केला सामुहिक बलात्कार, वडील वाचवायला गेल्यावर त्यांच्यावरही केला हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहिबगंज(झारखंड)- झारखंडमध्ये एका मुलीवर स्कॉर्पियो गाडीत कथितरीत्या में कथित बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानीक पोलिसांनी सांगितल्यानुसार एका तरुणाने मुलीवर बलात्कार केला, तर त्याच्या मित्रांनी त्याला यात साथ दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या साहिबगंजमध्ये शाळेत जाताना मुलीचे अपहरण करण्यात आले, नंतर स्कॉर्पियो गाडीत तिच्यावर बलात्कार झाला. मुलीच्या साक्षीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानीक लोकांनीही पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.


मुलीवर बलात्कार होत असल्याची माहिती एका व्यक्तीने मुलीच्या वडिलांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावर जाऊन मुलीला वाचवले. पण आरोपींना त्यांच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत वडील रक्तबंबाळ झाले. पोलिसांनी पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.