आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनाढ्य होण्याची इच्छा असल्यास करा या 8 पैकी कोणताही 1 अचूक उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्प डेस्कः  तुमचे उत्पन्न चांगले असूनही तुमची सेव्हिंग होत नसेल तर समजून घ्या की, तुमच्या घरात बरकत नाही.  तुमचे उत्पन्न चांगले असूनही तुमची सेव्हिंग होत नसेल तर समजून घ्या की, तुमच्या घरात बरकत नाही. याचा अर्थ तुम्ही कितीही पैसा कमावला तरी बचत काहीच होत नाही. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर खालील उपाय करावा.

 

उपाय -
रस्त्यावरून एखाद्या ठिकाणी जाताना एखादा किन्नर (तृतीयपंथी) दिसल्यास त्याला आपल्या इच्छेनुसार काही पैसे दान करावेत. त्यानंतर किन्नराकडून एक रुपयाचे नाणे (त्याच्याजवळचे, तुम्ही दिलेले नाही) मागून घ्या. हे नाणे तिजोरी, दुकानातील गल्ल्यात, धन स्थानावर ठेवा. या उपायाने थोड्याच दिवसात तुम्ही सेव्हिग वाढलेली तुम्हाला जाणवेल.

 

मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी उपाय
वर्तमान काळात बेरोजगारी एक मोठी समस्या होऊन बसली आहे. नोकरी नसल्यास समाजात तसेच घरातही मान-सन्मान मिळत नाही. तुम्ही बेरोजगार असाल आणि खूप प्रयत्न करूनही रोजगार मिळत नसेल तर निराश होण्याची आवश्यकता नाही. काही सोपे उपाय करून तुम्ही या समस्येतून मार्ग काढू शकता. येथे जाणून घ्या एक खास उपाय...

उपाय
एखाद्या शनिवारी हनुमानाच्या मंदिरात सव्वा किलो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. तुपाचा दिवा लावून मंदिरातच चंदनाचा माळेने 108 वेळेस खालील चौपाईचा जप करा.

चौपाई-
कवन सो काज कठिन जग माही।
जो नहीं होय तात तुम पाहिं।।

त्यानंतर नियमितपणे 40 दिवस दररोज घरातच या चौपाईचा जप करा. लवकरच तुमची ही समस्या दूर होईल.

 

गोमती चक्र उपाय-
ज्योतिषीय उपाय करताना एका विशेष दगडाचा वापर केला जातो. तो दिसायला साधारण दगडासारखाच दिसतो. परंतु, त्‍याचा प्रभाव असाधारण असतो. या दगडालाच गोमती चक्र म्‍हणतात. कमी किमतीला मिळणारे हे दगड गोमती नदीत मिळतात, म्‍हणून यांना गोमती चक्र म्‍हणतात. गोमती चक्रामुळे विविध समस्या दूर करणे शक्य आहे.

1. कोर्टातील कामासाठी घराबाहेर पडताना गोमती चक्रावर उजवा पाय ठेवून घराबाहेर पडल्यास यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते.
2. जर शत्रू वाढले असतील तर शत्रूच्या नावाचे जेवढे अक्षर आहेत तेवढे गोमती चक्र घेऊन त्यावर शत्रूचे नाव लिहून गोमती चक्र जमिनीत पुरून टाका. या उपायाने शत्रू परास्त होतील.
3. आर्थिक समस्या असतील तर 5 गोमती चक्र धनस्थानावर ठेवावेत. या उपायाने आर्थिक

समस्या दूर होण्यास मदत होईल.

 

काळ्या हळदीचा उपाय
हळदीचा उपयोग स्वयंपाकात तसेच पूजा सामग्रीमध्ये होतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. काळ्या हळदीचे सेवन केले जात नाही परंतु या हळदीचा उपयोग तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो. काळी हळद धन आणि बुद्धी कारक मानली जाते. तंत्र क्रियेमध्ये काळी हळद खूप पूजनीय आणि उपयोगी मानली गेली आहे. विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होतात.

1.काळ्या हळकुंडाचे ७ ते ९ दाने तयार करून घ्या. एका दोर्‍यामध्ये ओवून घ्या. त्यानंतर त्यावर धूप, गुगळ लावून गळ्यामध्ये धारण करा. जो व्यक्ती अशा प्रकारची माळ घालतो तो अशुभ ग्रहांच्या दुष्प्रभावांपासून दूर राहतो.
2.महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी काळ्या हळदीचा टिळा लावावा. या उपायाने कामामध्ये यश मिळेल.

कुटुंबात सुख-शांती ठेवण्यासाठी करा हा उपाय-
कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद-विवाद होत राहतात, परंतु हे वाद दररोज होऊ लागले तर वातावरण अशांत होते. कधीकधी हे वाद मोठ्या घटनेत रुपांतरीत होऊ शकतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी खालील उपाय करावा...

उपाय -
घरातील सर्व सदस्य ज्या भांड्यातील पाणी पितात त्यामधील पाणी दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी घरातील प्रत्येक खोलीत, छतावर शिंपडावे. या दरम्यान कोणाशीही बोलू नये आणि मनातल्या मनात ऊं शांति ऊं मंत्राचा जप करावा.

बातम्या आणखी आहेत...