आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या नेवादामध्ये झाडाखाली खेळत असलेल्या 25 मुलांवर पडली वीज, 8 जणांचा मृत्यू तर 10 गंभीररित्या भाजले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवादा(बिहार)- जिल्ह्यात आज(शुक्रवार) दुपारी वीज पडून 8 मुलांचा मृत्यू झाला, तसेच 10 जण गंभीररित्या भाजले गेलेत, त्यांना तत्काळ हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. घटना काशीचक परिसरातील धानपूर गावात घडली. या घटनेमुळे गावकरी सुन्न झाले आहेत. प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, धानपूर गावात दुपरी 25 मुले एका झाडाखाली खेळत होती. यावेळी त्यांच्यावर वीज पडली. त्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


मुलांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना 4-4 लाख रुपये मदतनिधी देण्याची मागणी केली आहे. एसडीओ अनु कुमार यांनी सांगितले की, धानपूर मुशहरी टोलामध्ये मुले खेळत होते, यावेळी पाऊस सुरू झाला. त्यानंतर पावसामुळे मुले एका झाडाखाली गेले आणि यावेळी अचानक त्यांच्यावर वीज पडली आणि 8 मुलांना आपला जीव गमवावा लागला. मृत मुलांमध्ये  नीतीश मांझी, रमेश मांझी, छोटू मांझी, गणेश मांझी, छोटी मांझी, मुन्नी लाल मांझी, मोनू आणि प्रवेश कुमार सामिल आहेत.

बातम्या आणखी आहेत...