आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 8 Day Old Baby Died Just AFTER A KISSED HER, Devasted Mom Warned Other Parents Not To Do This

Kiss घेतल्यामुळे 8 दिवसांच्या मुलीला गमवावा लागला जीव, डॉक्टर्सने सांगितले मृत्यूचे विचित्र कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - येथे एका महिलेच्या 8 दिवसांच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला कारण ठरले बाळाची पप्पी घेणे. या घटनेनंतर बाळाची आई इतर पॅरेंट्स आणि लोकांना सावध करत आहे. नवजात बाळ किती संवेदनशील असते याचे हे अगदी ताजे उदाहरण आहे. 19 वर्षांच्या एबिगेल रोझने 8 दिवसांपूर्वी एका निरोगी चिमुरडीला जन्म दिला होता. पण अचानक तिची तब्येत बिघडली आणि मृत्यू झाला. 


या चिमुरडीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी जे काही सांगितले ते सर्वांसाठी धक्कादायक असे होते. या मुलीचा मृत्यू HSV-1 नावाच्या एका अगदी साध्या व्हायरसची लागण झाल्याने झाला. डॉक्टर सांगतात की, त्या बाळाला या व्हायरसची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीने स्पर्श केल्याने किंवा किस केल्यामुळे याची लागण झाली होती. हा व्हायरस शरिरात जाऊन मणक्याला चिटकतो आणि फुफ्फुस तसेच मेंदूजवळ एक पातळ द्रव तयार करू लागतो. हळू हळू तो पदार्थ अंतर्गत अवयवांना नष्ट करू लागतो. त्यामुळे बाळ ब्रेन डेड होते. 


सर्वांना सावध करतेय आई 
मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या आईला जबर धक्का बसला आहे. पण तरीही ती या व्हायरसबाबत सर्वांना जागरूक करण्याचे काम करत आहे. एबिगेल म्हणाली की, नवजात बाळाला पाहायला जात तेव्हा त्याला किस करू नका आणि हात धुतल्याशिवाय स्पर्शही करू नका. त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो. एबिगेल म्हणते, हा आजार 1 लाखापैकी एका बाळाला होत असला तरी ती याबाबत जागरुकता पसरवत राहणार आहे. 


उपचार नाही 
डॉक्टर्सने सांगितले की HSV-1 हा तसे पाहता अत्यंत साधा व्हायरस आहे. पण नवजात बाळाला याची लागण झाली तर त्या बाळाचा जीव वाचवणे अत्यंत कठीण होऊन बसते. कारण 2 आठवडे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेले बाळ या व्हायरसशी लढण्यास सक्षम नसते. 

बातम्या आणखी आहेत...