आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्ये ८ दिवस चालणारा सॅन फर्मिन फेस्टिव्हल सुरू, यामध्ये लोकांच्या अंगावर सोडले जातात सांड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - स्पेनमधील पँपलोना येथे दरवर्षाप्रमाणे या वर्षीही सॅन फर्मिन फेस्टिव्हल सुरू झाला आहे. ८ दिवस चालणाऱ्या या पारंपारिक  महोत्सवाची सुरुवात आतषबाजीने करण्यात आली. या महोत्सवात लोकांच्या अंगावर सांड सोडले जातात. यामुळे या महोत्सवाला बुल रेस असेही म्हटले जाते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुल रेसमध्ये लोकांची हाडे मोडतात. रक्त वाहते. लाेक गंभीर जखमी झालेले असतात. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अानंदच दिसतो. यामुळेच हा महोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, याची सुरुवात संत अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी केली. यंदा या महोत्सवाचे हे १०० वे वर्ष आहे. यात जगभरातून १० लाख लाेक येण्याची अपेक्षा आहे.  या महोत्सवात सहभागी होणारे तरुण  सुरुवातीलाच नृत्य व मौजमजा करतात. नंतर एका जागी जमून सांडांना  बेभान करून सोडतात, असे आयोजकांनी सांगितले. 

 

हजारोंच्या संख्येने जखमी होतात
उत्सवाची सुरुवात पँपलोकना स्क्वेअरपासून होते. ८५० मीटर लांब व अरुंद रस्त्यावर शेकडो लोक सांडांसमोर उभे राहतात. यात दरवर्षी जखमी होणाऱ्यांची संख्या हजारावर असते. 

बातम्या आणखी आहेत...