Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

8 फेब्रुवारी 2019 आजचे राशिभविष्य : शुक्रवारी या राशींसाठी आहे खास दिवस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2019, 12:00 AM IST

Today Horoscope in Marathi (8 February 2019) शुक्रवारी या राशींना होऊ शकतो लाभ

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  शुक्रवार, 08 फेब्रुवारी 2019 रोजी माघ शुद्ध तृतीया असून पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या प्रभावाने शिव नावाचा योग जुळून येत आहे. नावाप्रमाणेच शिव हा योग अत्यंत शुभ आहे. या योगात केलेले सर्व मंत्र शुभफलदायक असतात. जर या योगात ईश्वराचे स्मरण केले तर यश निश्चित मिळते. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांच्या बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 7 राशींसाठी मात्र संमिश्र दिवस.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक राशीनुसार आपले राशिभविष्य...

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  मेष: शुभ रंग : मोतिया | अंक : २
  भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कराल. परंतू जास्त लाभाचा मोह टाळून सुरक्षित गुंतवणूकीस  प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज प्रवासात सावध रहा.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ 
  योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन करून हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. गृहीणींना  छंदातून अर्थप्राप्ती होईल. 

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ८
  आज सकारात्मकता तसेच स्वावलंबन फार महत्वाचे राहील. ऐकावे जनाचे व करावे मनाचे याच तत्वाने वागणे योग्य ठरेल. आज मित्रांना दूरून रामराम ठोका.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  कर्क :  शुभ रंग : आकाशी | अंक : ७
  नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. काही मनाविरूध्द घटनांनी नैराश्य येईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांचे मनोबल वाढेल.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
  काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटणार अाहेत. मतभेद झाले तरी मानसिक संतूलन ढळू देऊ नका. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे. 

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  कन्या : शुभ रंग : लाल | अंक : ५
  उद्योग व्यवसायातील पूर्वीचे नियम बदलावे लागतील.ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज पत्नीचे दिलेले सल्ले मोलाचे असतील.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
  कामगारांनी वरीष्ठांकडे केलेल्या मागण्या रास्त असल्यास मान्य होतील. ज्येष्ठांना काही आरोग्य विषयक चाचण्या कराव्या लागतील.  तब्येतीस जपा.  

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  वृश्चिक : शुभ रंग : राखाडी  | अंक : २
  हाती असलेला पैसा खर्च करून माेकळे व्हाल.  आज एखाद्या लेट नाईट चित्रपटाचा आस्वाद घ्याल. मित्रांमधे मोठेपणा मिळवायची तुमची धडपड असेल.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ७
  कुटुंबात आर्थिक सुबत्ता राहील. भावंडांमधील वाद सुसंवादाने मिटतील. मुले पालकांच्या आज्ञेत असतील. गृहीणी आज स्वत:चे छंद जोपासतील. 

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  मकर : शुभ रंग : निळा | अंक : ३
  दैनंदीन कामे आज कंटाळवाणी वाटतील. काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. एखाद्या नवीन विषयात रूची निर्माण होईल. शेजारी सलोखा वाढेल.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
  व्यवसायात केलेले कष्ट कारणी लागतील. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. यशदायी दिवस.

 • आजचे राशिभविष्य 8 February 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 February 2019

  मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : १
  परिवारात सामंजस्य राहील. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. आज काही महत्वपूर्ण बातम्या कानी येतील. आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली करा. 

Trending