आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांपूर्वी पीएफवर ८.६५% व्याज, लवकरच अधिसूचना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (ईपीएफओ) सहा कोटींहून जास्त ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी २०१८-१९ साठी भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.६५% व्याज मिळेल, अशी घोषणा मंगळवारी केली. या व्याजासह पीएफची रक्कम सणांपूर्वी सर्व सदस्यांच्या खात्यात जमा होईल. गंगवार म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण सध्या व्यग्र आहेत. त्यांच्याकडे ही फाइल आहे. या व्याजदराला त्या लवकरच मंजुरी देतील.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने संघटनेच्या खातेदारांच्या व्याजदरात १० मूळ अंकांची वाढ करण्यास मंजुरी दिली होती. तीन वर्षांत प्रथमच ही वाढ करण्यात आली होती. सध्या ईपीएफओच्या सदस्यांना या निधीवर ८.५५% व्याज मिळते. हे व्याजदर २०१७-१८ मध्ये  निश्चित करण्यात आले होते. चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदरात तीन वर्षांनंतर ०.१०% वाढ करण्यात आली आहे.