आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या 3 खान मंडळींजवळ आहे भरपूर काम, पण रिकामे बसले आहेत हे 8 खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये चित्रपट फक्त खान या आडनावरच चालतात. सलमान, शाहरुख आणि आमिर खान  या तिन्ही खान मंडळींकडे कायम चित्रपटांची रांग असते. निर्माते-दिग्दर्शक या तिघांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. पण प्रत्येक खान आडनाव असलेल्या अभिनेत्याचे नशीब सलमान, आमिर आणि शाहरुखसारखे नाही. बॉलिवूडमध्ये खान आडनाव असलेले असे अनेक अभिनेते आहेत, जे आज बेरोजगार आहेत. यामध्ये फरदीन खानपासून ते आमिर खानचा सख्खा भाऊ फैजल खानच्या नावाचा समावेश आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण त्यांना प्रेक्षकांकडून फारसे प्रेम मिळाले नाही. 

 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही Khan's विषयी सांगत आहोत, ज्यांच्याकडे ब-याच काळापासून काम नाही.

 

फैजल खान (भाऊ - आमिर खान)

आमिर खानचा भाऊ फैजल खान 'मेला' (2000) या चित्रपटात त्याच्यासोबत झळकला होता. काही चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर तो फिल्म इंडस्ट्रीतून जणू गायबच झाला. असे म्हटले जाते की, मध्यंतरीच्या काळात त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते आणि तो एकेदिवशी कुणालाही न सांगता तो घरातून निघून गेला होता. पण काही दिवसांनी तो परतला. परतल्यानंतर त्यांनी आमिरवर आरोप लावला होता की, आमिरने त्याला घरात डांबून ठेवले होते. इतकेच नाही तर त्याने आमिरवर संपत्ती हडपण्याचा आरोप लावला होता. फैजलने 'प्यार का मौसम' (1969), 'मेला' (2000), 'बॉर्डर हिन्दुस्तान की' (2003), 'बस्ती' (2003), 'चांद बुझ गया' (2005) सह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले, पण तो एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. सध्या त्याच्याकडे काहीच काम नाही. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सध्या बेरोजगार असलेल्या आणखी सात खान मंडळींविषयी...

बातम्या आणखी आहेत...