आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम; गिर्यारोहकांना रांगेत उभे राहून 2 तास वाटत पाहावी लागत आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू (नेपाळ)- एव्हरेस्ट पर्वतावर सध्या ट्रॅफिक जाम सारखी परिस्थीती निर्माण झाली आहे. येथे जवळपास 200 गिर्यारोहक रांगेत राहून शिखर सर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिमालयीन टाइम्सनुसार, यादरम्यान अनेक देशातील गिर्यारोहकांनी कॅम्प 4 मध्ये पोहचल्यानंतर 8848 मीटर ऊंचीवर जाताना वाटेतच दोन तास थांबावे लागले अशी तक्रार केली आहे.

 

भारताच्या अंजलि कुलकर्णी, कल्पना दास यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे 12 वाजेपर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर  त्यांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान एक अमेरिकी गिर्यारोहक डोनाल्ड कॅश शिखरावर जाताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, यादरम्यान हवामान चांगले नव्हते. त्यामुळे चढाई करण्याचे दिवसामध्ये घट करण्यात आली.यादरम्यान,  बेस कँपवर गिर्यारोहकांची खूप गर्दी झाली होती. गिर्यारोहक निर्मल पुरजा यांनी सांगितले की, गर्दीमुळे त्यांना 3 वेळेस थांबावे लागले.