आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या झळा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई प्रश्न; आठ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात ग्रामीण भागात पिण्याचे संकट गहिरे होत आहे. मराठवाड्यातील ३६४ गावांत ८ लाख १६ हजार १७९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती असून जिल्ह्यात ३२२ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात टँकरची संख्या आणखी वाढणार आहे. 

 

मराठवाड्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती ग्रामीण भागात चारा आणि पाणी या दोन समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचे स्रोत आटल्यामुळे केवळ टँकर हाच पर्याय ग्रामीण भागात शिल्लक राहिला आहे. टँकरची मागणी वाढल्यामुळे राज्य सरकारने देखील जिल्हाधिकाऱ्याकडे असलेले टँकरचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश दिले आहेत. 

 

जिल्ह्यात साडेसहा लाख लोकांना पाणीपुरवठा :

औरंगाबाद जिल्ह्यात ३२२ गावांतील ६ लाख ६४ हजार ४३१ लोकांना टँँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ९७ गावांतील १ लाख ७२ हजार २१० लोकांना १०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर वैजापूर तालुक्यातील ६६ गावांत १ लाख ३ हजार लोकांना ९० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जायकवाडी धरण असतानाही पैठणमधील ५७ गावांतील १ लाख १८ हजार ५३८ लोकांना ६२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सिल्लोड तालुक्यात ३९ गावांतील १ लाख ३० हजार ७०१ लोकांना ७३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर फुलंब्री तालुक्यातील १६ गावांना१८ टँकरने, खुलताबाद तालुक्यातील १० गावांना ९ टँकरने, पाणीपुरवठा केला जात आहे.

 

जालना जिल्ह्यात १ लाख लोकांना टँकरने पाणी 
जालना जिल्ह्यात ३२ गावांतील १ लाख १ हजार ७१० लोकांना ६१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील १८ गावांना २४ टँकरने, जाफराबाद तालुक्यातील ११ गावांना १४ टँकरने, तर भोकरदन शहराला २० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर बीड जिल्ह्यात १४ गावांतील ४२ हजार लोकांना १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ गावांना ३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...