आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दुःख आणि संताप; मात्र 80 लाख लोक पॉर्न साइटवर शोधताहेत 'हैदराबाद गँगरेप' व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्याच्या घटनेच्या विरोधात संसदेत मंगळवारी देखील पडसात उमटले. दिल्ली ते तेलंगणापर्यंत सुरू असलेल्या निषेधाच्या दरम्यान विकृत मानसिकता दर्शविणारी एक बातमी समोर आली आहे. भारतात निर्बंधानंतरही सुरु असलेल्या एका पॉर्न साइटवर दोन दिवसांत तब्बल 80 लाख लोकांनी हैदराबाद पीडितेच्या नावाने व्हिडिओ सर्च केले. पीडितेच्या नावाने व्हिडिओ सर्च करण्याचा हा आकडा फक्त एका साइटचा


या वेबसाइटवर हैदराबादच्या पीडितेचे नाव टॉप ट्रेंडिंगमध्ये राहिले. सायबर तज्ज्ञांचे मानने आहे की, ही माहिती फक्त एक वेबसाइटची आहे. भारतात निर्बंध असूनही शेकडो पॉर्न साइट्स डोमेन नाव बदलून सुरु आहेत. पीडितेचे नाव जर एका साइटवर बऱ्याच वेळा सर्च केले गेले तर शेकडो साइट्वर कितीवेळा सर्च केले असेल याचा अंदाज लावणे कठीण नाही.