आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अलवर(राजस्थान)- मंगळवारी पोलिस ठाण्यासमोरून 8 महिन्यांच्या विवेकला घेऊन पऴून गेलेल्या महिलेने बुधवारी संध्याकाळी 6 वाजता त्याला पोलिस ठाण्यात आणले, त्यानंतर पोलिसांनी बाळाला त्याच्या आईकडे दिले. त्यानंतर बाळाच्या अपहरणामुळे 34 वर्षीय महिला बीना आणि तिची 30 वर्षीय बहीण रीनाला अटक केली.
एएसपी मुख्यालय देवेंद्र कुमार विश्नोई यांनी सांगितले की, विजय मंदिर पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपी बीना व रीना यांनी सांगितले की- ज्या बाळाचा तुम्ही शोध घेत आहात ते आमच्याकडे आहे. चौकशीत त्यांनी सांगितले की, त्यांचे सासर दिल्लीत आहे, तर बहिण रीनाचे सासर पहाडीमध्ये आहे. बीनाला 5 वर्षांची मुलगी आहे तर रीनाला 2 मुले आहेत. बीनाने सांगितले- दुकानदार महिला बीना जाटव तिला म्हणाली की, तु हे बाळ घेऊन जा. मला ते बाळ इतक आवडले की, मी त्याला गावी घेऊन गेले.
वर्तमानपत्र फोटो पाहिला आणि गुन्हा कळाला- बीना प्रजापत
''मी आणि माझी बहिण गणेश मार्केट मध्ये सामान खरेदी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही फुटपाथवर कॉस्मॅटीक सामान विकणारी महिला बीना जाटवला बोलत थांबलो होतो, तेव्हा एक महिला आली आणि म्हणाली 500 रूपये दे, आणि जाताना मस्करीत म्हणली 500 रूपयांसाठी मुलाला देत आहे. तेव्हा मी बीनाला विचारले की, खरच 500 रूपयांत बाळ मिळते का? तेव्हा तिने माझ्या हातात ते बाळ दिले आणि म्हणाली तु घेऊन जा हे बाळ. त्यानंतर आम्ही ते बाळ घेऊन आलो. गावी गेल्यावर गावातील लोकांनी आम्हाला सांगितले की, तुमचा फोटो आला आहे. त्यानंतर आम्हाला आमची चुक कळाली आणि आम्ही बाळाला परत देण्यासाठी आलो''
बीनाने मला सांगितले दोन महिला आल्या आणि बाळाला घेऊन गेल्या- बाळाची आई चंदा
'' मी गेणेश मार्केटमध्ये सामान खेरेदी करण्यासाठी गेले होते. फुटपाथवर दुकान लावणारी बहिण बीनाला मला भेटायचे होते. माझे बाळ झोपले होते त्यामुळे मी त्याला बीनाजवळ दिले. परत आल्यावर तिने सांगितले की, दोन महिला आल्या आणि बाळाला खेळवण्याच्या बाहाण्याने त्याला घेऊन गेल्या. पण आता तो मिळाला आहे त्यामुळे मी खुप आनंदी आहे''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.