आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि मुलाला दिल्लीला घेऊन जात होता युवक, एक कॉल आला आणि घेतला चिमुकल्याचा जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमोह(मध्यप्रदेश)- जिल्ह्यातील पटेरा ठाण्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर वडिलाने आपल्याच 8 महिन्यांच्या मुलाची गळा चिरून हत्त्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेहासोबत पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. 


एकाच हट्टावर अडून होती पत्नी
पोलिसांनी सांगितलेकी, धिरज वर्मन पत्नी किर्ती आणि 8 महिन्यांच्या मुलगा राजूनला घेऊन दिल्लीला जात होता. तेघेही बस स्टँडवर पोहचले, तेव्हा धिरजच्या मोबाईलवर संदिप नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि तो म्हणाला- किर्तीला दिल्लीला नको घेऊन जाऊस, तिला इथेच ठेव. त्याने किर्ती आणि त्याचे प्रेम संबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर किर्ती आणि धिरजमध्ये वाद झाला. त्यानंत किर्तीने दिल्लीला जाण्यास नकार दिला आणि माहेरी जाण्याचा हट्ट धरला. त्यानंतर किर्तीच्या हातून त्याने राजूला घेतले आणि पोलिस ठाण्याकडे पळाला. पळत-पळत त्याने राजूच्या गळ्यावर कोयत्याने वार केला आणि त्यातच त्याचा जीव गेला.

 


एक वर्षापूर्वी झाला होता विवाह
धिरजने पोलिसांना सांगितले की, एक वर्षापूर्वी त्याचे किर्तीसोबत लग्न झाले होत, पण 7 महिन्यातच त्यांना बाळ झाले. लग्न झाल्यापासून किर्तीला दिल्लीला जायचे नव्हते, ती नेहमी नकार द्यायची. शिवाय संदीप वर्मनसोबत किर्तीचे प्रेम संबंध होते. किर्तीनेही त्याला सांगितले होते, की घाई-घाईत तिचे लग्न केले होते.

 


खून करण्याचा पश्चाताप नाही
8 महिन्याच्या चिमुकल्याचा खून केल्यानंतही धिरजला पश्चाताप नाहीये. विचारल्यावर तो म्हणाला की, मुलगा त्याचा नाहीये, त्यामुळे त्याने राजूचा खून केला. आरोपी म्हणाला हत्त्या केल्यानंत त्याचे टेन्शन संपले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...