आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Couple Injured In Bike Accident, 8 Months Pregnant Took Husband To Hospital In Jodhpur And Saved His Life

८ महिन्याची गर्भवती असतांना नवऱ्यासाठी केला संघर्ष, प्रत्येकजण देतोय कौतुकाची थाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुर - ही संघर्षमय गोष्ट आहे भोजावास येथील २४ वर्षीय 'सावित्री'ची जिने आपल्या नवऱ्याला साक्षात मृत्युच्या दारातून बाहेर आणले आहे.  तेदेखील स्वत: ८ महिन्यांची गर्भवती असतांना.

 

नवऱ्याला घेऊन ६ दिवसांत फिरली ५ हॉस्पीटल
>>  इंद्रा आपल्या कुटुंबासोबत मेळा पाहण्यासाठी जात असतांना त्यांच्या दुचाकीला एका कारने धडक दिली. इंद्राने स्वत: सोबत आपल्या नवऱ्याला सावरले. लोकांच्या मदतीने भोजवास येथील रूग्णालयात दाखल केले असता त्यांना दुसऱ्या सरकारी रूग्णायात जाण्यास सांगितले. तिथे नरसीरामवर प्रथमाेपचार करून तिसऱ्या हॉस्पीटला हलविण्यास सांगितले. तिथेही एक्स-रे काढुन हाताला प्लास्टर करून जोधपूरला जाण्याचा सल्ला दिला. 

 

>> ६ दिवसांत फिरलेल्या  ५ रूग्णालयांपैकी एकाही रूग्णालयात इंद्राला तिच्या नवऱ्याला योग्य उपचार भेेटले नाही. अखेर १० सप्टेंमर रोजी इंद्रा आपल्या पतीला एमडीएम रूग्णालयात दाखल केले.  तेथील डॉक्टरांना नरसिरामचे जुने एक्स-रे पाहुन धक्का बसला.

>> ऑर्थोपेडिक विभागाचे डॉ. महेंद्र टाक म्हणाले की,  एक्स-रे नुसार, रुग्ण जिवंत नसेल किंवा जिवंत असला तर त्याच्या हातापायाला लकवा झाला असेल . पण नरसिरामला पाहून ते आश्चर्यचकित झाले. डॉ. टाक यांनी नरसीरामच्या मणक्याचा  पुन्हा एक्स-रे काढला.  परिणाम जुन्या एक्स-रे सारखेच होते. नंतर एमआरआई  काढुन १२ सप्टेंबरपासून उपचारास सुरूवात केली.

>>  एक्स-रेच्या रिपोर्टनुसार नरसिरामचे ऑपरेशन करणे अतिशय अवघड काम होते. 

>> दरम्यान इंद्रा आपल्या नवऱ्याची सेवा करत होती. १२ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचे ठरविले. त्याचवेळी इंद्राच्या पोटात वेदना सुरू झाल्या. अशावेळी तिच्या सोबतीला कोणीही नव्हते. 

>>  डॉक्टरांना विचारून ती आशा केंद्रावर गेली. तिथे तिला भरती करून घेतले. १२  ऑक्टोबरला तिच्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या िदवशीच इंद्राने तिच्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला. 

 >> शुद्धीवर येताच डॉक्टरांना फोन करून आपल्या नवऱ्याची चौकशी केली. प्रसुतीच्या 24 तासांतच इंद्रा सर्व वेदना विसरून पती नरसिराम भरती केलेल्या एमजीएच रूग्णालयात पोहोजली.
>> इंद्राचे पतीबद्दल असलेले प्रेम आणि संघर्ष पाहुन डॉक्टर हैरान झाले. त्यांनी तिच्या पतीची पूर्ण काळजी करण्याचे वचन देऊन इंद्रास घरी पाठवले. शनिवारी इंद्रा देखील करवा चौथचे व्रत करणार आहे,


डॉक्टरांनी देखील केली मदत
डॉ. किशोर राय चंदानी व डॉ. महेश भाटी यांच्या नेतृत्वात स्पाइनल कॉर्ड विशेषज्ञ डॉ. महेंद्र सिंह टाक तपासणीसाठी एमडीएम वारंवार न येता त्यांनी रूग्णाला एमजीएचमध्ये हलविले होते. रूग्णासोबत कोणीही नसल्यामुळे डॉक्टरांनीच ऑपरेशनच्या दिवशी रुग्णाच्या अन्न-पाण्याची व्यवस्था केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...