आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 मुस्लिम देशांत पूर्वीपासून BAN आहे Triple Talaq, भारतात तयार होतोय कायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात सुप्रीम कोर्टाने तीन तलाक बेकायदेशीर ठरविला आहे. कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय देऊन मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांची बूज राखली आहे. कोर्टाने यावर सरकारने कायदा करण्याची सूचना केली आहे. तिहेरी तलाकवर बंदी घालावी यासाठी भारतीय मुस्लीम महिलांनी बऱ्याच वर्षांपासून आंदोलन सुरु केले होते. याउलट जगातील इतर देशांमध्ये यावर फार पूर्वीपासून बंदी आहे. विशेष म्हणजे यात मुस्लिमबहुल देशांचाही समावेश आहे.


येथे तीन तलाक बॅन
पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की, सायप्रस, ट्यूनिशिया, अल्जेरिया, मलेशिया, इराण, श्रीलंका, जॉर्डन, इंडोनेशिया, यूएई, कतार, सुदान, मोरक्को, इजिप्त, इराक, ब्रुनेई.

 

पाकिस्तानातही तिहेरी तलाकवर बंदी 
- पाकिस्तानमध्ये 1961 मध्ये तीन तलाक बेकायदेशीर ठरविण्यात आला होता. पाकिस्तान सरकारने तलाकसाठी एक कौन्सिल तयार केले आहे. ज्या व्यक्तीला तलाक पाहिजे त्याने कौन्सिलच्या चेअरमनला एक नोटिस पाठवावी लागते. या नोटीसची एक कॉपी पत्नीला पाठवायची असते. यानंतर 30 दिवसांनी कौन्सिल दोन्ही पक्षांना बोलावून त्यांच्यामध्ये समेट करण्याचा प्रयत्न करते. यानंतर 90 दिवसांचा कालावधी दिला जातो, त्यातही समेट झाला नाही तर तलाक मान्य केला जातो.


पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या कोणत्या देशात तलाकची कोणती पद्धत... 

बातम्या आणखी आहेत...