आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात 8 Pakistani नागरिक पोलिसांच्या ताब्यात, 4 महिलांसह एका चिमुकलीचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर - भारताच्या स्वातंत्र्य दिनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजस्थानात 8 पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून पोलिसांनी त्यांना पकडले. यामध्ये 4 महिला आणि एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. या सर्वांना भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दल आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाईत पकडले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, यापैकी 5 जणांना रविवारी रात्री अनुपगड परिसरातून आणि उर्वरीत 3 जणांना सोमवारी सकाळी पकण्यात आले आहे. 


हरिद्वारच्या व्हिसावर राजस्थानात काय करत होते?
पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यापैकी 5 जणांकडे व्हिसा सापडले आहेत. त्या व्हिसामध्ये त्यांना हिंदू तीर्थ स्थळ हरिद्वारच्या दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. पाकिस्तानी नागरिकांनी ही गोष्ट मान्य केली. परंतु, हरिद्वारपासून 600 किमी दूर श्रीगंगानगर सीमेवर ते नेमके काय करत होते आणि त्यांचा हेतू काय होता याचा शोध पोलिस घेत आहेत. श्रीगंगानगर जिल्ह्यात असलेल्या अनुपगड शहराला पाकिस्तानच्या सीमा आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...