Home | Khabrein Jara Hat Ke | 8 thousand corpses and 1252 mummies in the Italian Museum

सिलसिली बेटावरील संग्रहालयात भरवण्यात आले 8 हजार मृतदेह आणि 1252 पुरातन ममीचे प्रदर्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 07:37 PM IST

ममी बनवण्यासाठी लागतात 70 दिवस

  • 8 thousand corpses and 1252 mummies in the Italian Museum

    पालेर्मो(इटली)- येथील स्वायत्त बेटावर 'सिलसिलीच्या पालेर्मो कॅपुचिन' संग्रहायलात ठेवलेल्या 8 हजार मृतदेहासोबत आता 1252 पेक्षा अधिक ममीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या शहराला मृतदेहाचे शहर असेही म्हटले जाते. 16 व्या शतकात ईसाई भिक्षूंनी मृतदेह दफन करण्याचे आणि ममी ठेवण्याचे काम सुरू केले होते. आता या प्रदर्शनामुळे सामान्य नागरिकसुद्धा हे मृतदेह आणि ममी पाहू शकतील.


    यापुर्वी या ठिकाणी एक स्मशानभूमी होती, नंतर येथे संग्रहालय बांधण्यात आले आणि मृतदेह ममीच्या रूपात सुरक्षित ठेवण्यात आले. पण 1920 नंतर या ठिकाणी मृतदेह ठेवण्याचे काम बंद करून याला संग्रहालयात बदलण्यात आले. विशेष बाब म्हणजे या विचित्र संग्रहालयाला फक्त भिक्षु लोक चालवतात. येथे आपण ममी कबर आणि ताबूतमध्ये वेगवेगळ्या अवस्थेत पाहू शकता. यातील काही ममी पुर्णपणे सुरक्षित असून काही मोडकळीस आल्या आहेत.


    ममी बनवण्यासाठी लागतात 70 दिवस
    माहीतीनुसार, ममी बनवण्याची प्रक्रिया अवघड असून यासाठी 70 दिवस लागत होते. यासाठी धर्मगुरूंसोबत तज्ञांची एक टीम बनवली जायची, जेणेकरून हे काम पुर्ण होईल. ममी हा शब्द प्राचीन इजिप्तचा नसून तो अरबी भाषेतील मुमियापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ होतो मेणाचा लेप लावलेली एखादी वस्तू. पण विशेष बाब म्हणजे इजिप्तध्ये ममी बनवण्याचे काम खूप श्रद्धेने केले जाते.

Trending