आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरमधून पाण्याचा ८ हजार क्युसेकने जायकवाडीकडे विसर्ग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - गंगापूर धरणाच्या पाणलाेट क्षेत्रासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून ८४ टक्के भरलेल्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग १ हजाराने वाढवून ८ हजार ८३३ क्युसेक करण्यात आला आहे. ८७ टक्के भरलेल्या दारणा धरणातून १३ हजार ५८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे मराठवाड्यात जायकवाडी धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ हाेणार आहे. तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील आठ तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे मराठवाड्याला पाणी देणारी महत्त्वाची असलेली या भागातील धरणे भरू लागली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. 

 

जायकवाडीत २४ तासांत आले ६० दलघमी पाणी

औरंगाबाद  - सलग तिसऱ्या दिवशी जायकवाडीत पाण्याचा ओघ कायम आहे. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी रात्री सात वाजेपर्यंत धरणात २ टीएमसीपेक्षा अधिक पाणी आले आहे. जायकवाडी धरणात सध्या ६४७  दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी ७३८  दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता धरणात ६१२ दलघमी पाणीसाठा होता. १२ तासांत ३५ दलघमी  पाण्याची आवक झाली. सध्या जायकवाडीत ३० हजार क्युसेकने आवक होत आहे. दोन दिवस विसर्ग कायम राहिल्यास या धरणातील जलसाठा मृतसाठ्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...