आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा सुटल्यानंतर बहिणीची वाट पाहत होता चिमुकला, डोक्यावर पडला 1 क्विंटलचा लोखंडी गेट, जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - शाळा सुटल्यानंतर दप्तर घेऊन बाहेर पडलेला 8 वर्षांचा मुलगा आपल्या बहिणीची वाट पाहत बसला होता. वाट पाहताना त्याने शाळेच्या मुख्य लोखंडी गेटवर झोका खेळण्यास सुरुवात केली. अचानक तो गेट तुटून मुलाच्या अंगावर पडला. तब्बल एक टन वजन असलेला हा गेट थेट त्या मुलाच्या डोक्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी 4.15 वाजता झांसी रोड येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत घडली आहे. 


झांसी रोड येथील बजरंग नगर परिसरात राहणाऱ्या संतोष वंशकारचा मुलगा रोहित (8) तिसरीला होता. त्याची एक बहिण याच शाळेत पाचवीला होती. रोज शाळा सुटल्यानंतर ते बाहेर थांबून एकमेकांची वाट पाहायचे. रोहित मंगळवारी सुद्धा असाच आपल्या बहिणीची वाट पाहत होता. या दरम्यान त्याने गेटचा झोका खेळण्यास सुरुवात केली. परंतु, 30 वर्षे जुने आणि 1 टन वजनी असलेले तो गेट थेट त्या मुलाच्या अंगावर पडला. हा गेट पूर्णपणे गंजलेला होता, त्याचे जाइंट्स सुद्धा गंजून झिजले होते. कुटुंबियांनी या अपघातासाठी शालेय प्रशासनाच्या गलथान कारभाराला जबाबदार धरले आहे. 


4 मुलींनंतर जन्मला होता रोहित
रोहित घरात सर्वांचाच लाडका होता. त्याच्या जाण्याने आई-वडिलांसह सर्वच बहिणींना मोठा मानसिक धक्का बसला. त्याच्या आई-वडिलांना 4 बहिणीनंतर मुलगा झाला होता. रोहितनंतर आणखी एक भाऊ सुद्धा आहे. परंतु, रोहितची घरात विशेष जागा होती. आपल्या मुलाच्या निधनानंतर बाप संतोषने त्याचा मृतदेह हातात धरून हंबरडा फोडला. आपल्या मुलाला सोडून देवाने मलाच मारायला हवे होते असे तो बोलत होता. 


वॉचमन होता दुसऱ्याच ड्युटीवर 
शालेय प्रशासनाने या घटनेनंतर हात झटकले आहेत. गेट खराब झाल्याची माहिती आपल्याला नव्हती असे शाळेच्या प्राचार्या नमिता सक्सेना यांनी सांगितले. नुकतेच शाळेच्या गेटला एक कार धडकल्याने एक भाग तुटला होता. त्याची वेल्डिंग करून दुरुस्ती करण्यात आली होती. यानंतर गेट पुन्हा खराब झाल्याची काही तक्रार आली नाही असे त्या म्हणाल्या. सोबतच, त्या दिवशी गेटवर बसणारा वॉचमन इलेक्शन ड्युटीला गेला होता असे शालेय प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, गरीबांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने पोलिस आणि प्रशासन या घटनेकडे दुर्लक्षच करतील अशी प्रतिक्रिया या मुलाच्या मोठ्या बाबांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...