आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल डेस्क/ कोच्ची - केरळच्या 14 पैकी 11 जिल्ह्यांत पाऊस आणि पुराने थैमान घातले. पण सर्वाधिक फटका बसला तो, अलाप्पुझा, एर्नाकुलम आणि त्रिशूरमध्ये. भीषण पुरामुळे केरळमध्ये सुमारे 7.5 लाख लोक बेघर झाले. त्यांच्यासाठी 5,645 निवासी शिबिरांची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून आणि विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मदत पुरवली जात आहे. लोक वेगवेगळ्या प्रमाणे पीडितांची मदत करत आहे. तमिळनाडूच्या विलुपुर्रम येथील एका चिमुरडीनेही पूरग्रस्तांना तिचा गल्ला फोडून मदत केली. चार वर्षांपासून सायकलसाठी ही चिमुरडी गल्ल्यात पैसे साठवत होती.
4 वर्षांपासून साठवत होती पैसे
मीडिया रिपोर्ट्सनुसार अुप्रिया नावाची ही 8 वर्षांची मुलगी 4 वर्षांपासून सायकलसाठी पैसे साठवत होती. पण केरळच्या पूरग्रस्तांसाछी तिने तिचा गल्ला फोडून पैसे दान केले. चिमुरडीच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. एका यूझरने लिहिले की, खरंच आता वाटते की, भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. एका यूझरच्या पोस्टवर सायकल तयार करणारी कंपनी हिरोनेही प्रतिक्रिया दिली आहे.
कंपनी गिफ्ट करणार सायकल
कंपनीने पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, प्रिय अनुप्रिया.. आम्ही गरजेच्या वेळी मानवतेला जीवंत ठेवणार्या तुमच्या पावलाचे कौतुक करतो. आम्ही तुम्हाला एक नवी सायकल देऊ इच्छितो, तुम्ही आम्हाला तुमचा पत्ता पाठवा किंवा, customer@herocycles.com द्वारे आम्हाला संपर्क करा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.