आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववी आणि सातवीतील 3 विद्यार्थ्‍यांनी केला 8 वर्षांच्‍या मुलीवर गँगरेप, चुलत भावानेही केले दुष्‍कर्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/सिमरोल -   सिमरोलजवळील दतोदा गावात 3 अल्‍पवयीन विद्यार्थ्‍यांनी 8 वर्षांच्‍या मुलीवर गँगरेप केल्‍याचे धक्‍कादायक प्रकरण समोर आले आहे. 21 सप्‍टेंबररोजी ही घटना घडली. तिन्‍ही मुलांनी मुलीला उचलून झुडूपात नेले होते. तेथे त्‍यांनी हे दुष्‍कर्म केले. घटनेविषयी कोणालाही न सांगण्‍याबद्दल त्‍यांनी मुलीला ऐवढे धमकावले होते की, वेदना असह्य होईपर्यंत मुलीने कोणालाही याची माहिती दिली नाही.

 

वेदना असह्य झाल्‍यावर रडत-रडत बहिणीला सांगितली घटना
- घअनेच्‍या 5 दिवसानंतर बुधवारी वेदना असह्य झाल्‍यानंतर मुलीने रडत-रडत घटनेबाबत आपल्‍या बहिणीला माहिती दिली.  त्‍यानंतर नातेवाईकांनी ताबडतोब पोलिसात याबाबत तक्रार दिली. मुलीला एमवाय हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आले आहे. तिन्‍ही मुलांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. धक्‍कादायक म्‍हणजे अल्‍पवयीन आरोपींमध्‍ये मुलीच्‍या चुलत भावाचाही समावेश आहे.
- माहितीतून समोर आले आहे की, हे सर्व आरोपी 9वी आणि 7वीचे विद्यार्थी आहेत. तपास अधिकारी राकेश कुमार नयन यांनी दिलेल्‍या माहितीनूसार, जबरदस्‍ती केल्‍यानंतर तिन्‍ही आरोपींनी मुलीला आणि तिच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्‍याची धमकी दिली होती.


इंदूरमध्‍ये सूरू आहे उपचार
सध्‍या मुलीवर इंदूर येथे उपचार सुरू आहेत.  मुलीच्‍या सुरक्षेसाठी हॉस्पिटलमध्‍ये एक महिला कॉन्‍स्‍टेबलही तैनात करण्‍यात आली आहे. लवकरच या प्रकरणाचा तपास पुर्ण करू असे पोलिसांनी सांगितले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...