आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 लाखांची सुपारी देऊन केली महिलेची हत्या, 8 वर्षानंतर झाला खुलासा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने 8 वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला आहे. महिलेचा मृतरदेह यमुना किनारी उस्मानपूर परिसरात डिसेंबर 2011 मध्ये मिळाली होती. सुरूवातीला मृतदेहाबद्दल पोलिसांना काहीच पुरावे सापडले नाही. तर महिलेच्या भावाने जानेवारी 2012 महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार मॉडल टाउन पोलिस ठाण्यात केली होती. महिलेच्या भावाने संशय व्यक्त केला होता की, तिचे पतीसोबत भांडण झाले असावे.


त्याने हेदेखील सांगितले की, घर मालकासोबत तिचे घर रिकामे करण्यावरून वाद सुरू होते. पण त्यावेळी पोलिसांना घर मालकी किंवा पतीविरूद्ध काहीच पुरावे मिळाले नाही. 2015 मध्ये पोलिसांनी हत्येची फाइल बंद केली. पण यावर्षी 23 जानेवारीला दिल्ली पोलिसांनी ही फाइल क्राइम ब्रांचकडे सोपवली होती. क्राइम ब्रांचने नव्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली.


क्राइम ब्रांचचे डी.सी.पी. राम गोपाल नायक यांनी सांगितले की, या प्रकरणी तीन लोकांना अटक केले आहे. वकील वीरेंद्र कुमार, घर मालक अहलूवालिया आणि एक रिक्शा चालक कमलेश यांचा समावेश आहे. महिलेची हत्या करण्यासाठी घर मालक अहलूवालियाने वकील वीरेंद्रला 30 लाखांची सुपारी दिली होती. यासाठी 10 लाख अॅवव्हान्स दिले होते, तर 20 लाख काम झाल्यावर देण्यात आले.


चौकशीत आरोपींनी सांगितले की, महिला अहलूवालियाच्या घरात किरायाने राहत होती. घर मालकाला त्याचे घर रिकामे करून हवे होते, पण महिला घर रिकामे करण्यास तयार नव्हती. तर दुसरीकडे महिलेचे तिच्या पतीसोबतदेखील वाद सुरू होते. या वादाचे प्रकरण कोर्टात वकिल वीरेंद्र लढत होता, त्यामुळे हत्येची सुपारी त्याला देण्यात आली होती.


जेव्हा महिला केस संदर्भात वकिलाला भेटायला गेली होती, तेव्हा तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. नंतर तिचा मृतदेह यमुना नदीच्या किनाऱ्यावर फेकूण देण्यात आला. पोलिस या प्रकरणी अजून आरोपींचा शोध घेत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...