आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजच्या 80 विद्यार्थिनींनी केस कापून दान केले, यापासून कॅन्सर पीडित रुग्णांसाठी विग बनवले जाणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​कोयम्बतूर : कोयम्बतूरमधील एका खाजगी कॉलेजच्या 80 विद्यार्थिनींनी केस कापून दान केले आहेत. या केसांचा वापर कॅन्सर सर्व्हायवर रुग्णांसाठी विग बनवण्यात होईल. विद्यार्थीनी म्हणाल्या, 'आम्ही फायनान्शियल सपोर्ट करू शकत नाही, त्यामुळे केस दान करत आहे'

आमच्या केसांपासून बनणारा विग घातल्याने त्यांच्या कॅन्सर सर्व्हायवर रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद येईल. कॅन्सर पीडितांची मदत करणारी मुंबईची संस्था ‘मदत ट्रस्ट’ नुसार, विग बनवण्यासाठी साधारण 10 इंच लांब केसांची गरज असते. 

200 विद्यार्थिनी केस दान करतील... 

विद्यार्थिनी विनोथिनी यांनी सांगितले, ‘‘मी येथे 8 इंच केस कापून दान केले आहेत. हे कॅन्सर पीडित रुग्णांसाठी विग बनवण्याच्या कामी येतील. माझ्या डोक्यात विचार आला की, मी आर्थिक स्वरूपाने यांची मदत करू शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.’’ विनोथिनीने सांगितले की, केसांचे दान करण्यासाठी 80 विद्यार्थिनींनी रजिस्ट्रेशन केले होते, पण आणखी काही विद्यार्थिनी समोर येतील. ही संख्या 200 पर्यंत पोहोचू शकते.