आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँगमधील आंदोलनाला ८० दिवस पूर्ण, ५ वर्षांपूर्वीच्या अंब्रेला आंदोलनाला टाकले मागे; आंदोलकांचा लैंगिक शोषणाचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँगमध्ये बुधवारी रात्री आंदोलकांनी पुन्हा एकदा शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले. - Divya Marathi
हाँगकाँगमध्ये बुधवारी रात्री आंदोलकांनी पुन्हा एकदा शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले.

हाँगकाँग - येथेे प्रस्तावित प्रत्यार्पण कायदा संपवण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या अंब्रेला आंदोलनाला ८० दिवस पूर्ण झाले. २०१४ मध्ये याच मागणीसाठी ७९ दिवसांचे आंदोलन झाले होते. जूनपासून आतापर्यंत ८ हजारावर आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे तर बुधवारी सुमारे ५ हजार आंदोलकांनी कॅथे विमानतळ जाम केले. याचा परिणाम देशभरातील १००० विमानांच्या उड्डाणांवर झाला. ही वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाच्या समर्थनार्थ आलेल्या २० विमान कर्मचाऱ्यांच्या निलंबनास आंदोलकांनी विरोध केला. त्यांनी रात्री कँडल मार्च काढला. पोलिस आता ठाण्यात आंदोलकांचे लैंगिक शोषण करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.  तिकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी उद्योगपतींची बैठक घेत देशभक्तीचा जागर कायम ठेवा, असे आवाहन केले आहे. 
 

तीन टप्पे : शांतता, तीव्रता आणि हिंसा
जून:९ जूनला आंदोलनाला सुरुवात झाली.  रॅलीत १० लाख लोक सहभागी.
जुलै : १ जुलैला आंदोलक हाँगकाँगच्या संसदेत घुसले.
ऑगस्ट :  २५ ला आंदोलन हिंसक. पोलिसांनी रोखल्या बंदुका.