आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर : यजमान टीम इंडियाच्या युवा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालने शुक्रवारी बांगलादेश संघाविरुद्ध सलामीच्या कसाेटीतील पहिल्या डावात शानदार द्विशतक ठरले. त्याचे यंदाच्या सत्रामधील हे दुसरे द्विशतक नाेंद झाले अाहे.
त्याने पहिल्या डावात २५४ धावांची संयमी खेळी केली. यासह त्याच्या नावे अाता सुरुवातीच्या १२ डावांत ८०० पेक्षा अधिक धावांची नाेंद झाली. अशा प्रकारचा पराक्रम गाजवणारा मयंक हा भारताचा पहिला फलंदाज ठरला. टाॅप-५ फलंदाजांनाही अातापर्यंत अशा प्रकारची कामगिरी नाेंद करता अाली नाही. त्याच्या करिअरमधील ही ८ वी कसाेटी अाहे. त्याने १२ डावांत हा विक्रमी धावांचा पल्ला गाठला अाहे. यात प्रत्येकी तीन शतकांसह अर्धशतकांचा समावेश अाहे. त्याने नावे अाता ८५८ धावा नाेंद केल्या अाहेत. टाॅप- ५ फलंदाजांना सुरुवातीच्या १२ डावांत ६०० धावाही पूर्ण करता अाल्या नाहीत. चेतेश्वर पुजारा (५४), रवींद्र जडेजा (नाबाद ६०) अाणि अजिंक्य रहाणे (८६) यांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी केले. याच्या बळावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ४९३ धावा काढल्या. भारताने पहिल्या डावातील अाधारे ३४३ धावांची अाघाडी मिळवली अाहे. बांगलादेश संघाला पहिल्या डावात १५० धावा काढता अाल्या. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी यजमान भारतीय संघाने कालच्या १ बाद ८६ धावांवरून सकाळी खेळण्यास सुरुवात केली.
मयंकने एकट्याने तिसऱ्या दिवशी २०६ धावा काढल्या.
कमी डावात दाेन द्विशतक करणारे खेळाडू
विनोद कांबळी 5 डाव
मयंक अग्रवाल 8 डाव
डॉन ब्रॅडमॅन 13 डाव
मयंक भारताकडून एकाच सत्रात द्विशतक करणारा
विनोद कांबळी - 1993
राहुल द्रविड - 2003
सचिन तेंडुलकर - 2004, 2010
वीरेंद्र सेहवाग - 2008
विराट कोहली - 2016, 2017
मयंक अग्रवाल - 2019
पहिल्यांदा संघाकडून चार डावांत खेळी
फलंदाज - धावा - विरुद्ध
मयंक अग्रवाल - 215 - द. अाफ्रिका
विराट कोहली - 254* - द. अाफ्रिका
रोहित शर्मा - 212 - द. अाफ्रिका
मयंक अग्रवाल - 243 - बांगलादेश
भारताच्या तिसऱ्यांदा एकाच दिवशी ४००+
प्रतिस्पर्धी - स्कोअर - मैदान - वर्ष
श्रीलंका - 443/1 - मुंबई - 2009
श्रीलंका - 417/2 - कानपूर - 2009
बांगलादेश - 407/5 - इंदूर - 2019
टेस्ट : सर्वाधिक धावा काढणारे फलंदाजांचे सुरुवातीचे १२ डाव
1 सचिन: 369 रन, 50+/3, 100/0
2 पाँटिंग: 466 रन, 50+/4, 100/1
3 कॅलिस: 295 रन, 50+/2, 100/1
4 द्रविड: 436 रन, 50+/3, 100/0
5 कुक: 594 रन, 50+/5, 100/2
दिग्गज कसाेटीपटूंचे सुरुवातीचे १२ डाव
फलंदाज : धावा : 50+ : 100
गावसकर : 912 : 9 : 4
ब्रॅडमन : 862 : 6 : 4
लारा : 5:96 : 5 : 1
स्टीव्ह स्मिथ : 356 : 3 : 0
कोहली : 278 : 2 : 0
एकाच दिवशी २००+ रन काढणारे भारतीय फलंदाज
फलंदाज : रन : विरुद्ध : वर्ष
सेहवाग : 284 : श्रीलंका : 2009
सेहवाग : 257 : द. अाफ्रिका : 2008
नायर : 232 : इंग्लंड : 2016
सेहवाग : 228 : पाकिस्तान : 2004
धोनी : 206 : ऑस्ट्रेलिया : 2013
मयंक : 206 : बांगलादेश : 2019
धावफलक नाणेफेक बांगलादेश (फलंदाजी)
बांगलादेश - पहिला डाव : १५० धावा भारत कालच्या १ बाद ८६ धावांवरून पुढे
भारत (पहिला डाव) : धावा : चेंडू : ४ : ६
मयंक झे. जायेद गाे. मेंहदी : २४३ : ३३० : २८ ८
राेहित झे.लिटन गाे. अबु जायेद : ०६ : १४ : ०१ : ०
पुजारा झे.सैफ गाे. जायेद : ५४ : ७२ : ०९ : ०
विराट काेहली पायचीत गाे.जायेद : ०० : ०२ : ०० : ०
रहाणे झे. तैजुल गाे. जायेद : ८६ : १७२ : ०९ : ०
रवींद्र जडेजा नाबाद : ६० : ७६ : ०६ : २
वृद्धिमान साहा त्रि.गाे. एदाबत : १२ : ११ : ०२ : ०
उमेश यादव नाबाद : २५ : १० : ०१ : ०
अवांतर : ०७. एकूण : ११४ षटकांत ६ बाद ४९३ धावा.
गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१४, २-१०५, ३-११९, ४-३०९, ५-४३२, ६-४५४.
गाेलंदाजी : एदाबत हुसैन ३१-५-११५-१, अबू जायेद २५-३-१०८-४, तैजुल इस्लाम २८-४-१२०-०, मेहंदी हसन २७-०-१२५-१, महमुद्दुल्लाह ३-०-२४-०.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.