आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभरी पार केलेल्या जोडप्याच्या लग्नाचा 80 वा वाढदिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या टेक्सास प्रांताची राजधानी ऑस्टिनचे रहिवासी जॉन हेंडरसन १०६ वर्षांचे आहेत. डिसेंबरमध्ये ते १०७ वर्षांचे होतील, तर त्यांची पत्नी चार्लोट हेंडरसन या १०५ वर्षाच्या आहेत. १५ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला ८० वर्षे पूर्ण होतील. 'टुडे न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील सर्वांत आनंदी, यशस्वी वयस्कर जोडपं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वांत वयस्कर जोडपं म्हणून त्यांंची नोंद झाली आहे. आरोग्याचे रहस्य विचारल्यावर जॉन म्हणाले, ते १९३४ मध्ये टेक्सास विद्यापीठाते शिकत होते, तेव्हा फुटबॉलचे खेळाडू होते. शिक्षिका बनण्याचे स्वप्न घेऊन चार्लोटने पण त्याच विद्यापीठात प्रवेश घेतला होता. ती नेहमी आमचा फुटबॉलचा खेळ बघायला यायची. जुन्या आठवणी सांगतााना जॉन सांगतात, मी चार्लोटला पहिल्यांदा कॉलेजमध्ये एका लेक्चर हॉलमध्ये पाहिलं. तिला बघून हसलो, ती पण माझ्याकडे पाहून हसली. प्रेमाने माझ्याकडे बघत राहिली. ती मला पहिल्या भेटीतच आवडली. मग आम्ही नियमित भेटू लागलो. आमच्या भेटीचं रुपांतर लग्नात झालं. यशस्वी वैवाहिक आयुष्याचं रहस्य विचारल्यावर जॉन सांगतात, विविध खेळ, फिरणे, व्यायाम यामध्ये आम्ही आमचा वेळ घालवतो. तसेच चार्लोट नेहमी सकारात्मक विचार करत असते. नेहमी आम्ही एकमेकांसोबत चेष्टा, मस्करी करत असतो. मला वाटतं हेच आमच्या सुखी आयुष्याचं रहस्य आहे. जॉन यांनी 'टुडे'शी बोलताना सांगितले की, २०१० मध्ये त्यांना एक पुरस्कार मिळाला होता. पूर्व यूटी फुटबॉल खेळाडू' हा सन्मान देऊन मला गौरविण्यात आलं. मजेशीर गोष्ट ही आहे की, आमचं इतकं वय असून देखील दरवर्षी आम्ही यूटी फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी जातो. जॉन यांचा पुतण्या जेसन सांगतो की अजूनही काका-काकी त्यांच्या भविष्याच्या योजनांचा विचार करत असतात.  

बातम्या आणखी आहेत...