आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 81 Libraries Were Created For People To Give Time For Reading Books Instead Of Mobile, Will Be Open For 24 Hours

लोकांनी मोबाइल सोडून पुस्तक वाचनाला वेळ द्यावा यासाठी बनवल्या गेल्या 81 लायब्ररी, 24 तास असतील सुरु

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

वेंगझोऊ : चीनमध्ये जेझियांग येथील वेंगझोऊ शहर प्रशासनाने लोकांचे मोबाइलचे व्यसन सोडवण्यासाठी शहरात 81 लायब्ररी बनवल्या आहेत. जेणेकरून लोक पुस्तकांमध्ये व्यस्त राहावे. ही लायब्ररी 24 तास सुरु राहील. प्रत्येक लायब्ररीमध्ये 2 ते 5 हजार पुस्तके ठेवली गेली आहेत. वेंगझोऊचे मेअर याओ गाओआंग म्हणाले, शहराची लोकसंख्या सुमारे 92 लाख आहे. लोक दिवसभर काम करतात आणि रात्री येऊन फोनमध्ये व्यस्त होतात. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन तर बिघडतेच पण त्यासोबतच त्यांना अनेक आजारही घेरतात. त्यामुळे त्यांना स्वस्थ बनवण्यासाठी आणि मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या लायब्ररीजची निर्मिती केली गेली आहे.  

सुट्टीच्या दिवशी 3 तासच गेम खेळू शकतात मुले... 


लायब्ररीमध्ये लोक कधीही नि:शुल्क पुस्तक वाचू शकतात. चीनीने मागच्या महिन्यापासून ऑनलाइन गेम खेळण्यावर बंदी केली आहे. यांच्याअंतर्गत 18 वर्षणापेक्षा कमी वयाची मुले एका दिवसात केवळ 90 मिनिटेच गेम खेळू शकतात. याव्यतिरिक्त वीकेंड आणि सुट्यांमध्ये तीन तास गेम खेळण्याची परवानगी आहे.