आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टर आणि नेत्यांकडून जप्त केलेल्या 82 गाड्यांचा लिलाव, मिळालेले पैसे गरिबांना वाटले जाणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिकॅली- मॅक्सिको सरकारने गरीबांची मदत करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने, भ्रष्ट नेते आणि गुंडांकडून जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात सरकार आपल्या भ्रष्टाचार विरोधी अभियानांतर्गत जवळपास 82 वाहनांचा लिलाव करणार आहे आणि यातून मिळणारा पैसा सामाजिक कार्याद्वारे गरीबांना देणार आहे.


वाहनांच्या लिलावातून सुमारे 9 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल
सरकारने नुकतेच 'इंस्टीट्यूट टू रिटर्न स्टोलेन गुड्स' म्हणजे चोरीचे सामान परत करणाऱ्या संस्थाची स्थापना केली आहे. या संस्थेचे संचालक रिकार्डो रोड्रिगेज वर्गासनुसार, लिलावात समाविष्ट वाहनांची किंमत तब्बल 10 लाख पाउंड (8 कोटी 81 लाख रुपये) आहे. 


लिलावात 53 लाखांची लॅम्बोर्गिनीचाही समावेश
या लिलाव होणाऱ्या वाहनामध्ये एक 61 हजार पाउंड (53 लाख रुपये) लॅम्बोर्गिनी मुर्सियेलागो आणि 50 हजार पाउंड (44 लाख रुपये)  किंमतीची फोर्ड शेल्बीचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त एक बुलेटप्रूफ एसयूव्ही आणि 2009 हमरचे मॉडलही आहे. तसेच, पुढील आठवड्यात भ्रष्ट नेते आणि ड्रग माफियांकडून जप्त केलेली घरे आणि दागिन्यांचाही समावेश आहे. 

 

राष्ट्रपती ओब्रादोर यांच्या नेतृत्वात सुरू झाले अभियान
मॅक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रादोर यांनी या अभियाने समर्थन केले आणि लोकांना या लिलावात भाग घेण्याचे अवाहान केले आहे. मागील वर्षी निवडणूक जिंकलेले ओब्रादोर यांनी स्वच्छ राजकारनाचे वचन दिले होते. नुकतेच त्यांच्या कामगिरीवर घेतलेल्या पोलमध्ये त्यांना 70 टक्के समर्थन मिळाले आहे.