आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - शनिवारी संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद सभागृहात ८३ तास ३० मिनिटे काम झाले असून गोंधळ व अन्य कारणामुळे ९ तासाचा वेळ वाया गेला, असे रोज सरासरी केवळ सहा तास काम झाले. आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी मुंबई येथे भरणार असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अधिवेशन संस्थगित करताना सांगितले.
या अधिवेशनात विधान परिषदेत २०१८ तारांकित प्रश्न आले होते. त्यातील ९०० प्रश्न स्वीकृत झाले तर अवघ्या ६३ प्रश्नांना मंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली. नियम ९३ च्या ३७ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ११ सूचनांवर चर्चा झाली आणि १८ सूचनांची निवेदने पटलावर ठेवण्यात आली. ८८ औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले होते. ८७५ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ४४ सूचनांवर चर्चा झाली, तर विशेष उल्लेखाच्या १७४ सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या.
नियम ९७ अन्वये पाच अल्पकालीन चर्चा झाल्या. मंत्र्यांनी नियम ४२ अन्वये १५ निवेदने केली. नियम २६० अन्वये पाच प्रस्तावावर चर्चा झाल्या. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावर वरिष्ठ सभागृहात चर्चा झाली. २४ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाले होते. जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या भीतीमुळे सादर अधिवेशन एक आठवडा लवकर गुंडाळण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.