आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये 83 वर्षीय महिला प्रोग्रॅमिंग शिकून तयार करते मोबाइल अॅप, व्हिडिओ गेमही बनवले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - शिकण्याचे व शिकवण्यासाठी वय लागत नाही. जपानमधील मसाका वाकामिया या महिलेने वयाच्या ६० व्या वर्षी पहिला संगणक विकत घेतला. आता त्यांचे वय ८३ आहे. या वयातही त्या मोबाइल अॅप तयार करत आहेत. वाकामिया यांनी म्हटले, जपानी भाषा लिहिता -वाचता येते, पण त्यांना इंग्रजी येत नाही, अशा लाेकांसाठी माझे मोबाइल अॅप खूप उपयोगी आहे. त्या सांगतात, मी एकटीच राहते. यामुळे माझे सर्व लक्ष प्रोग्रॅमिंगवर आहे. आज इंटरनेटवर बहुतांश बाबी इंग्रजीत असतात. आमच्या पिढीतील लोकांना इंग्रजी योग्य प्रकारे समजत नाही. सर्व वृद्ध मंडळीनी तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा , असे मला वाटते. तंत्रज्ञानाद्वारे नव्या नव्या लोकांशी तुम्ही जोडले जाल. यामुळे तुमचे एकाकीपणही दूर होईल. तुमच्यातील कौशल्य लोकांसमोर आणू शकता. आयुष्यातील उर्वरित दिवस तुम्ही आनंदात काढू शकता. 


जपानला 'सुपर एज्ड नेशन' म्हटले जाते. सरकारी आकडेवारीनुसार येथे दर चार व्यक्तीमागे एकजण ६५ पेक्षा जास्त वयाचा आहे. वाकामिया यांनी घरात एक संगणक प्रशिक्षण केंद्रही सुरू केले आहे. त्या सांगतात, लोकांनी विशेषत: नव्या पिढीने माझ्या विचारांचे खूप कौतुक केले याचाच मला खूप आनंद वाटतो. मला खूप नव नव्या गोष्टी शिकण्यास आवडतात. मला वाटते आजच्या पिढीतील तरुण मुलामुलींनी काही तरी नवे शोध लावले पाहिजेत असे मला वाटते. त्यासाठी त्यांना मदत करण्यासही मी तयार अाहे.

 
२०१७ मध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट 
वाकामिया यांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अॅपलचे सीइओ टिम कुक यांची भेट घेतली होती. अॅपलवर भाषेच्या अडचणीवर सल्लाही दिला होता. 

बातम्या आणखी आहेत...