Home | Gossip | 83 years actor dharmendra do organic farming

मुंबईपासून 80 कमी दूर येथे एका खास पद्धतीने शेती करतात धर्मेंद्र शेती, या शेतीला पैसे लागतात कमी आणि उत्पन्न मिळते जास्त, सरकारला पण वाटते सर्वांनी याच पद्धतीने करावी शेती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 04:50 PM IST

पाहुयात 83 व्या वर्षी याच पद्धतीने धर्मेंद्र शेती का करतात..

 • 83 years actor dharmendra do organic farming

  एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता धर्मेंद्र आपला 83 वा वाढदिवस साजरा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या फार्महाऊसचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शन लिहिले होते, 'गो ऑरगॅनिक, ग्रो ऑरगॅनीक'. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र सांगतात की ते ऑरगॅनिक शेती करत आहेत आणि ऑरगॅनिक भाज्या शरीरासाठी चांगल्या असतात.

  सरकार सुद्धा आता ऑरगॅनिक शेतीला प्राधान्य देत आहे. आज आम्ही सांगत आहोत ऑरगॅनिक शेती का आणि किती गरजेची आहे. धर्मेंद्र त्यांच्यासारखीच तुम्हीही ऑरगॅनिक शेती करू शकता. यामध्ये खर्च कमी लागतो आणि येणारे उत्पन्नही खूप फायदेशीर असते.

  काय असते ऑरगॅनिक शेती..
  - ऑरगॅनिक शेतीमध्ये पेस्टीसाईड्स, फर्टिलायझर्स, अँटिबायोटिक्स यांचा उपयोग केला जात नाही. ऑरगॅनिक शेती केमिकल शेतीपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ असते.
  - याने मातीची गुणवत्ता कमी न होता वाढत जाते. शेण, झाडाचा पाला आणि कचरा यांनी बनलेले खाद्य रोपांना दिले जाते. यामुळे रोपांना केमिकलविरही पोषकतत्व मिळतात. जैविक शेती पूर्णतः केमिकलविरहित असते.
  - त्यामुळे या शेतीमधून मिळणाऱ्या फळे, भाज्या खाल्याने शरीराला कसलाही अपाय होत नाही.

  का गरजेची आहे ऑरगॅनिक शेती..
  - केमिकल आणि पेस्टीसाईड्समुळे शेतीचे फार नुकसान होत आहे. आणि त्यामुळे मातीचा कसंही कमी होत आहे. शिवाय या भाज्या खाल्ल्यामुळे माणसालाही अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे.
  - शेतकऱ्याचा जास्तीत जास्त पैसे पेस्टीसाईड्स आणि केमिकल्समध्ये वाया जातो. त्यामुळे अंती त्याला फायदा न होता नुकसानच जास्त होते.

  ऑरगॅनिक शेतीचे फायदे..
  - यामुळे मातीची उत्पादनक्षमता वाढते.
  - प्रदूषण होत नाही आणि वातावरण चांगले राहते.
  - कमी पाण्यात ही शेती होते.
  - केमिकलविरहित उत्पन्न मिळते. पेस्टीसाईड्स आणि केमिकल्सवर होणारा खर्च वाचतो.

Trending