आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICU मध्ये भर्ती झाली पत्नी म्हणून पतीने सोडले अन्न-पाणी, त्यांचीही प्रकृती झाली खराब म्हणून ICU मध्ये केले भर्ती, 18 तासानंतर दोघांनीही सोडला श्वास...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- बाल विनय मंदिर स्कूलमधून रिटायर्ड 90 वर्षीय शिक्षक रवींद्र जोशी आणि 86 वर्षीय कल्पना जोशी यांचे 65 वर्षांचे अतुट नाते होते. त्या दोघात इतके प्रेम होते की, एकाला काही व्हयाचे तर दुसरा खाने-पीणे सोडायचा. तीन-चार दिवसांपूर्वी पण असेच झाले. घरात असताना पत्नी पडली, म्हणून त्यांना एका खासगी रूग्णालयात भर्ती केले, तब्येत जास्ती खराब झाली म्हणून आयसीयूत भर्ती करावे लागले. पतीला याची माहिती मिळताच त्यांनीही अन्न-पाणी सोडले. त्यांनतर त्यांचीही तब्येत खराब झाली आणि त्यांनाही आयसायूत भर्ती करावे लागले.

 

दोखांची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा, सोबतच झाला अंत्यविधी
सुदामा नगर यांनी सांगितले की, दोघे आमचे मामा सासरे आणि सासु होते. सोमवारी संध्याकाळी 4 वाजता मामाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी 11 ला अंत्यविधीसाठी जायचे होते, घरात सगळी तयारी झाली होती. मृत्युची बातमी मामाला नव्हती दिली पण सकाळी रूग्णालयातून कॉल आला की, 10 वाजता मामीचाही मृत्यु झाला. त्यानंतर दोघांचीही अंत्ययात्रा सोबतच काढून सोबतच अंत्यविधी करण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...